राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शरम करो आंदोलन..लाईट खरेदीतील घोटाळ्याचा भांडाफोड

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शरम करो आंदोलन..लाईट खरेदीतील घोटाळ्याचा भांडाफोड
Dhule Corporation
Dhule Corporation

धुळे : राष्ट्रवादी काँग्रेसने शहरातील नागरी समस्यांविरोधात आवाज उठवत मनपाला धारेवर धरले असून आज लाईट खरेदीतील घोटाळ्याचा भांडाफोड करताना 'शरम करो' आंदोलन केले. यावेळी महापालिकेच्या पायऱ्यांवरच ठिय्या आंदोलन केल्याने शहर अभियंत्यांनी आंदोलकांशी चर्चा केली. मात्र, समाधानकारक उत्तर न मिळाल्याने आंदोलन सुरुच ठेवण्यात आले. त्याचबरोबर दिवाळीपूर्वी शहरातील पथदिवे सुरु न झाल्यास विद्युत विभागाच्या दालनात फटाके फोडण्याचा इशारा देण्यात आला आहे. (dhule-corporation-news-NCP-exposes-scam-in-purchase-of-agitation-lights)

शहरात एलईडी पथदिवे लावण्याचा ठेका धुळे महापालिकेने गुजरातमधील वल्लभ इलेक्ट्रिकल्सला तब्बल १३ कोटींना दिला आहे. जवळपास १७ हजार पोलवर लाईट बसविले जाणार होते. मात्र, प्रत्यक्षात ठेकेदार आणि मनपातील अधिकारी, पदाधिकारी यांनी संगनमताने या ठेक्यात घोळ केला असून शहर अंधारात आहे.

Dhule Corporation
महाराष्‍ट्रात राजकीय टोळी युद्धाने शेतकऱ्यांची वाताहात; राजू शेट्टी यांचा आरोप

असा केला घोटाळा

मुस्लिम बहुल भागासह मोगलाई जुने धुळे, मोहाडी, हमाल मापाडी प्लॉट, देवपूर विटाभट्टी, वडजाई रोड आदी भागात पथदिवे बंद आहेत. मनपात २१ कोटी रुपयांची लाईट खरेदी दाखविताना व्यवहारात अनियमितता असून लाईट बदलताना प्रत्यक्षात सुरु असलेले ८ हजार बल्ब काढण्यात आले. ते गेले कुठे? असा सवाल उपस्थित करुन हे बल्ब परस्पर विकले गेल्याने त्याची चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादीने केली आहे. शहरातील १९ रस्त्यांवरील पथदिव्यांसाठी शासनाने नगरोत्थान योजनेंतर्गत ८ कोटी रुपये मंजुर केले असून दोन वर्षात या रकमेतून काय काम झाले? याचा हिशेब मागतानाच सामान्य बाजारात ४०० रुपयांना मिळणारा एलईडी महापालिकेने ४ हजार रुपयांना विकत घेतल्याने शरम करो आंदोलन करण्यात येत असल्याचे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com