Dhule: सत्ताधारी नगरसेवकाकडूनच सभापतींना घरचा आहेर

सत्ताधारी नगरसेवकाकडूनच सभापतींना घरचा आहेर
Dhule: सत्ताधारी नगरसेवकाकडूनच सभापतींना घरचा आहेर
Dhule CorporationSaam tv

धुळे : शहरातील अनेक प्रश्‍न, भ्रष्‍ट्राचाराचे मुद्दे मांडून देखील ते सोडविले गेले नाही. यामुळे महापालिकेच्या आज झालेल्या स्थायी समितीच्या सभेत सत्ताधारी पक्षातील नगरसेवक नागसेन बोरसे यांनीच सभापतींना (Dhule) घरचा आहेर दिला आहे. (dhule corporation news ruling corporator target for the speakers)

Dhule Corporation
वांग्याच्या पिकातून खर्चही निघेना, वैतागलेल्या शेतकऱ्यानं असं काही केलं की..

गेल्या अडीच- तीन वर्षांपासून (Dhule Corporation) आम्ही अनेक प्रश्न व समस्या मांडत आहोत. भ्रष्टाचाराच्या प्रकरणांवर जाब विचारत आहोत. त्यावर सभापती कार्यवाही करण्याचे आदेशही देतात; परंतु आजपर्यंत कोणत्याच आदेशावर कार्यवाही झाली का? असा प्रश्न सत्ताधारी पक्षाचेच म्हणजेच भाजपचे (BJP) नगरसेवक नागसेन बोरसे यांनी भर सभेत कचऱ्याचे दृश्य दाखवणारे बॅनर झळकवत सभापतींना विचारला आहे.

तर समितीच बरखास्‍त करा

सभापतींच्या आदेशालाच केराची टोपली दाखविली जात असेल तर स्थायी समितीच बरखास्त करावी; असे देखील उदगार नगरसेवक नागसेन बोरसे यांनी भर सभेत केले. सत्ताधारी पक्षातील नगरसेवक आहेत हा प्रश्न उपस्थित केल्यामुळे विरोधकांचा देखील भुवया भरसभेत उंचावल्या.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.