एक ही भूल कमल का फूल..शिवसेनेची अनोखी स्‍टाईल

एक ही भूल कमल का फूल..शिवसेनेची अनोखी स्‍टाईल
एक ही भूल कमल का फूल..शिवसेनेची अनोखी स्‍टाईल
Dhule Corporation

धुळे : प्रशासनाच्‍या विरोधात आक्रमक भुमिका घेवून शिवसेनेने आंदोलन केले. ‘एक ही भूल कमल का फूल’ असे म्हणत शिवसेनेचे पालिका प्रवेशद्वारावर अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले. (dhule-corporation-news-shiv-sena-unique-style-Movement-against-bjp)

धुळे शहरामध्ये गेल्या कित्येक महिन्यांपासून रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. वारंवार विविध संघटनांतर्फे त्याचबरोबर नागरिकांतर्फे पालिका प्रशासनाला निवेदन देऊन व रस्त्याची दुरुस्ती करण्याबाबत मागणी करण्यात आली. परंतु या मागणीकडे पालिका प्रशासन अक्षरशः दुर्लक्ष करत आहे.

Dhule Corporation
भाजपकडून शिवसेनेची कोंडी; स्विकृत नगसेवक निवडीवरून गोंधळ

झोपलेल्‍या प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्‍न

झोपेचे सोंग घेणाऱ्या पालिका प्रशासनाला जाग आणण्यासाठी शिवसेनेच्यावतीने धुळे महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर पालिका प्रशासनाचा निषेध करण्यासाठी अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले आहे. एक ही भूल कमल का फूल अशा प्रकारच्या घोषणाबाजी करत शिवसेनेच्या वतीने पालिका प्रवेशद्वारावर आंदोलन करण्यात आले आहे. या आंदोलनाच्या वेळी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com