धुळ्यात गावठी कट्ट्यांचा वाढला वापर; दोघांच्या गावठी कट्ट्यासह आवळल्या मुसक्या

धुळ्यात गावठी कट्ट्यांचा वाढला वापर; दोघांच्या गावठी कट्ट्यासह आवळल्या मुसक्या
धुळ्यात गावठी कट्ट्यांचा वाढला वापर; दोघांच्या गावठी कट्ट्यासह आवळल्या मुसक्या

भूषण अहिरे

धुळे : धुळ्यात गेल्या काही दिवसांपासून गावठी कट्ट्याचा वापर सर्रासपणे केला जात असल्याचं उघडकिस आले. गुप्‍त माहितीच्‍या आधारावर स्‍थानिक गुन्‍हे अन्वेषण विभागाने कारवाई करत दोन जणांना ताब्‍यात घेतले. (dhule-crime-news-lcb-police-action-and-two-porson-arrested-gavthi-katta)

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळालेल्‍या माहितीच्‍या आधारे तपासाची चक्रे फिरवल्यानंतर गुप्त माहितीदाराकडून तालुक्यामध्ये दोन ठिकाणी गावठी कट्टे सर्रासपणे घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पथक तैनात करून धुळे शहरातील अग्रेसन पुतळ्याजवळ असणाऱ्या सचिन मासाळ या तरुणास ताब्यात घेत त्याच्याकडे असलेला गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे पथकाने हस्तगत केले. त्याचबरोबर तालुक्यातील आर्वी याठिकाणी देखील संदीप चौधरी या इसमाकडे गावठी कट्टा असून हा इसम गावठी कट्टा आपल्यासोबत बाळगत असल्याचे देखील माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाल्यानंतर पथकातील पोलिसांनी संदीप चौधरी या तरुणाच्या मुसक्या आवळल्या. त्याच्याकडे असलेला गावठी कट्टा व एक जिवंत काडतुसे हस्तगत केले आहे.

धुळ्यात गावठी कट्ट्यांचा वाढला वापर; दोघांच्या गावठी कट्ट्यासह आवळल्या मुसक्या
इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे सायकल रॅली

जीवंत काडतुसे बाळगतात कशी?

दोनही कारवायांमध्ये दोन गावठी कट्टे व तीन जिवंत काडतुसे पोलिसांनी हस्तगत करीत दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. परंतु या तरुणांकडे सहजपणे गावठी कट्टे येतातच कसे हा प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित होत असून या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक पुढील तपास करीत आहेत.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com