Dhule Crime News: दिरानं मर्यादा ओलांडली; भावजयीवरअत्याचार करत पेट्रोल टाकून पेटवले; मध्यरात्रीच्या घटनेने खळबळ
धुळे : सोनगीर (ता. धुळे) येथील ३७ वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार केल्यावर मध्यरात्रीनंतर तिच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला जिवंत जाळल्याची खळबळजनक घटना धुळे (Dhule) शहरातील कृषी महाविद्यालय परिसरात घडली. पोलिसांनी (Police) पीडितेच्या जबाबावरून दिराला अटक केली आहे. (Maharashtra News)
सोनगीर (धुळे) येथील ३७ वर्षीय महिलेने आझादनगर पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीनुसार (Songir) दीर बाळू यादवचंद्र (रा. गुरुकृपा कॉलनी, चितोड रोड, धुळे) याने २१ मेस रात्री आठला कृषी महाविद्यालय परिसरातील नाल्यालगत बोलाविले. सोमवारी (२२ मे) मध्यरात्रीनंतर दीड ते दोनच्या सुमारास संशयित बाळू याने बळजबरीने नाल्याजवळ (Crime News) लैंगिक अत्याचार केला. यानंतर बांधून ठेवले. तेथे त्याच्या दुचाकीमधील पेट्रोल काढून अंगावर टाकले आणि पेटवून दिले. या घटनेनंतर तो फरार झाला.
जिवाच्या आकांताने आरडाओरड
पेटल्यामुळे जिवाच्या आकांताने पीडिता मदतीसाठी आरडाओरड करू लागली. हा प्रकार कृषी महाविद्यालयाच्या पहारेकऱ्याला पहाटे लक्षात आला. यानंतर त्याने पोलिसांना माहिती दिली. पोलिस उपअधीक्षक एस. हृषीकेश रेड्डी, आझादनगरचे पोलिस निरीक्षक प्रमोद पाटील, संदीप पाटील तत्काळ पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी रुग्णवाहिकेला फोन केला. मात्र, रुग्णवाहिका न आल्याने आझादनगर पोलिसांनी पीडितेला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तिच्या जबाबानुसार संशयित बाळू चंद्र यांच्याविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल झाला.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.