त्‍यांनी ज्वारी विकली तीन हजार रुपये क्विंटल

त्‍यांनी ज्वारी विकली तीन हजार रुपये क्विंटल
त्‍यांनी ज्वारी विकली तीन हजार रुपये क्विंटल
MInister Dada Bhuse

कापडणे (धुळे) : पढावद (ता. शिंदखेडा) येथील अनंत पाटील यांनी ५०० एकरवर रब्बी ज्वारी (दादर) लावली होती. विकेल ते पिकेल अंतर्गत ज्वारी पिकवून तिला क्लिनिंग, ग्रीडिंग व पॅकींग करून थेट घरोघरी जाऊन शेतकरी ते ग्राहक समन्वय साधून खानदेशात विक्री केली. यामुळे ज्वारीला खर्च वजा जाता प्रती क्विंटल तीन हजाराचा भाव मिळाला. विकेल ते पिकेल या योजनेअंतर्गत त्यांचा कृषीमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते सन्मान झाला. (dhule-kapdane-village-farmer-jowar-home-to-home-sell-and-three-thousand-rate)

श्री. पाटील यांनी सांगितले, की कोरोनामुळे शेतकऱ्यांवर कठीण परिस्थिती निर्माण झाली आहे. पाहिजे तसा भाव शेतकऱ्यांना मिळत नाही. कृषी विभगाच्या अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. विकेल ते पिकेल अंतर्गत शेतीमाल बाजारभावापेक्षा जास्तने विकला गेला. जिल्ह्यातील बाजारात ज्वारीला प्रती क्विंटल एक हजार चारशे ते एक हजार पाचशेचा भाव होता. घरोघरी जाऊन पाच ते पन्नास किलोची पॅकिंग करून व गटाचे नाव देऊन तीन हजारांचा भाव मिळाला.

MInister Dada Bhuse
शेतकऱ्यांना विजेचे प्रश्‍न भेडसावू नये; आमदार कुणाल पाटील यांच्या सूचना

कृषीमंत्रींना ज्‍वारी दिली भेट

दरम्यान सोंडले (ता. शिंदखेडा) येथील कृषी कार्यक्रमात शेतकरी अनंत पाटील यांचा पालकमंत्री यांच्या हस्ते सन्मान झाला. पाटील यांनी मंत्री भूसे यांना तापी काठावरील शेतात पिकवलेली ज्वारी भेट दिली. यावेळी शिवसेना जिल्हाध्यक्ष हिलाल माळी, अरविंद जाधव, कृषी विभागीय उपसंचालक संजीव पडवळ, जिल्हा अधिकारी संजय यादव, जिल्हा कृषी अधिकारी विवेक सोनवणे, विनय बोरसे, गोरख चौधरी आदी उपस्थित होते.

शेतकऱ्यांचे जीवनमान उंचवयाचे असेल तर नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोखरा) योजना धुळे जिल्ह्यात लागू करा. जी दुष्काळ परिस्थितीमुळे हताश झालेल्या शेतकऱ्यांना संजीवनी ठरू शकते.

- अनंत शिवाजी पाटील (पढावद)

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com