धुळ्यात राजकीय वातावरण तापले; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

27 मतदानकेंद्र तसेच 14 हजार 27 मतदार या निवडणुकीत मतदान करणार आहेत.
धुळ्यात राजकीय वातावरण तापले; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
धुळ्यात राजकीय वातावरण तापले; दिग्गजांची प्रतिष्ठा पणालाSaam TV

भुषण अहिरे

धुळे : साक्री नगरपंचायतमध्ये सतरा प्रभागांपैकी 4 प्रभागांमध्ये ओबीसी आरक्षण असल्यामुळे 13 प्रभागांसाठी उद्या मतदान प्रक्रिया पार पडणार. 13 प्रभागामध्ये 69 उमेदवार रिंगणात आहेत. 27 मतदानकेंद्र तसेच 14 हजार 27 मतदार या निवडणुकीत मतदान करणार आहेत.

यंदाची पक्षीय लढत-: राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना ही निवडणूक एकत्र लढणार तर काँग्रेसने मात्र वेगळी चूल मांडल्याने भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असे चित्र नसणार आहे. साक्री नगरपंचायत मध्ये तिरंगी लढत बघावयास मिळणार..

प्रतिष्ठेची लढत-: या निवडणुकीमध्ये गेल्या पंचवीस ते तीस वर्षांपासून साक्री नगरपंचायतिच्या सत्तेचे गणित आपल्या अवतीभवती फिरवणारे ज्ञानेश्वर नागरे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

धुळे महानगरपालिकेत एकहाती सत्ता मिळवणाऱ्या भाजपला साक्री नगरपंचायत मध्ये भोपळा देखील फोडू न पावलेल्या भाजपतर्फे सत्ता काबीज करण्यासाठी धुळे जिल्ह्याचे भाजपा जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवली आहे.

राजकीय समीकरण -: गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये काँग्रेसची व राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. परंतु ज्ञानेश्वर नागरे यांनी काँग्रेसचा झेंडा सोडून शिवसेनेत प्रवेश केल्याने पक्षीय समीकरणं बदलली..

गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत असलेले पक्षीय बलाबल

काँग्रेस 11

राष्ट्रवादी 5

अपक्ष 1

भाजप 0

प्रचारक चेहेरे-: शिवसेना, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे प्रचारासाठी पालकमंत्री अब्दुल सत्तार तसेच मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रचार सभा घेतल्या तसेच आमदार मंजुळा गावित नंदुरबार चे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी देखील प्रचाराची धुरा सांभाळली..

काँग्रेसतर्फे,प्रचाराची धुरा स्थानिक नेत्यांच्या खांद्यावर असल्याचे बघावयास मिळाले, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शाम सनेर तसेच धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांच्यासह माजी आमदार डी एस आहेर यांनी प्रचाराची धुरा सांभाळली..

भाजपतर्फे, माजी संरक्षण राज्यमंत्री तथा खासदार सुभाष भामरे तसेच माजी पर्यटन राज्यमंत्री तथा आमदार जयकुमार रावल त्याचबरोबर नंदुरबारच्या खासदार हिना गावित तर भाजपचे जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांनी भाजपच्या प्रचाराची धुरा सांभाळली.

2) धुळे महानगरपालिका पोट निवडणूक ---

धुळे महानगरपालिका प्रभाग क्रमांक 5 ब मधील पोटनिवडणुकीसाठी उद्या मतदान

28 मतदान केंद्र

160 कर्मचारी या निवडणूक प्रक्रियेमध्ये नियुक्त

21,443 मतदार

धुळे शहराचे माजी आमदार अनिल गोटे यांच्या पत्नी हेमा गोटे यांनी नगरसेवक पदाचा राजीनामा दिल्यानंतर होत आहे पोटनिवडणूक

प्रभाग क्रमांक 5 ब येथील एका जागेसाठी होत असलेल्या पोटनिवडणुकीमध्ये भाजप, महाविकास आघाडी तसेच मनसे व अपक्ष चार उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

सध्या धुळे महानगरपालिकेत असलेले पक्षीय बलाबल-: 74 पैकी 50 भाजप,काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी 14,शिवसेना 2,एम आय एम 2,समाजवादी पार्टी 2,बसपा 1,अपक्ष 2 .. लोकसंग्राम 1 राजीनामा

महा विकास आघाडी विरुद्ध भाजप असा सामना..

प्रभागात 11 हजार 339 पुरुष तर दहा हजार 104 महिला मतदार आहेत. 28 मतदान केंद्र उभारण्यात आले आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com