धुळे DCC त खासदार भामरे गटास धक्का; माजी आमदार प्रा. पाटील विजयी

भाजपाचे प्राबल्य असलेल्या या बँकेवर पहिल्यांदाच महाविकास आघाडीच्या किसान संघर्ष पॅनलच्या माध्यमातुन विरोधी गट रिंगणात उतरला आहे.
sharad patil
sharad patil

धुळे : धुळे (dhule) नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या (dcc bank) निवडणुकीत खासदार सुभाष भामरे यांचे भाऊ सुरेश रामराव पाटील यांना पराभवचा धक्का बसला आहे. त्यांचे प्रतिस्पर्धी किसान संघर्ष पॅनलचे उमदेवार माजी आमदार प्रा. शरद पाटील (sharad patil) हे विजयी झाले आहेत. dhule nandurbar dcc election result latest news

sharad patil
जळगाव DCC त पाठींबा दिलेल्या माजी आमदारांचा पराभव; जनाबाई विजयी

धुळे नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीच्या मतमाेजणीस आज (साेमवार) सकाळी प्रारंभ झाला आहे. दोन जागा महाविकास आघाडीच्या किसान संघर्ष पॅनलच्या ताब्यात आल्या आहेत. दोन जागांवर भाजप पुरस्कृत सर्वपक्षीय शेतकरी विकास पॅनलने विजय मिळविला आहे. तसेच जिल्हा बँकेच्या निवडणुकीत किसान संघर्ष पॅनलचे उमेदवार माजी आमदार प्रा. शरद पाटील यांचा विजय झाला आहे. त्यांनी खासदार सुभाष भामरे यांचे भाऊ सुरेश रामराव पाटील यांचा पराभव केला आहे.

प्रा. पाटील यांच्या विजयानंतर त्यांच्या समर्थकांनी जल्लाेष केला. विजयानंतर प्रा. पाटील म्हणाले बॅंकेचा गैर कारभरा थाेपविण्यासाठी आम्ही किसान संघर्ष पॅनल स्थापित केला. आम्हांला संमीश्र यश आले आहे.

edited by : siddharth latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com