विठुरायाचे दर्शन घडविण्यासाठी चित्रातून साकारली पंढरीची वारी

विठुरायाचे दर्शन घडविण्यासाठी चित्रातून साकारली पंढरीची वारी
विठुरायाचे दर्शन घडविण्यासाठी चित्रातून साकारली पंढरीची वारी

धुळे : आषाढी एकादशी निमित्ताने यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पायी जाणाऱ्या वारकऱ्यांना पंढरपूरला मज्जाव करण्यात आला आहे. यंदा विठुरायाच्या भेटीला देखील भाविकांना मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे भाविकांचा चांगलाच हिरमोड झाला आहे. (dhule-news-aashadi-pandhari-wari-drawing-inblackboard-rajendra-bhadane)

धुळ्यातील भाविकांना विठुरायाचे दर्शन घडविण्यासाठी धुळ्यातील चित्रकार राजेंद्र भदाणे यांनी फक्त खडूच्या साहाय्याने विठुरायाचे व वारकर्यांबरोबरच टाळकरी, माळकरी, विणकरी व मृदुंग वादकांचे फळ्यावर हुबेहूब चित्र साकारले असून या चित्रातून भाविकांना विठ्ठलवारी अनुभवता येणार आहे.

विठुरायाचे दर्शन घडविण्यासाठी चित्रातून साकारली पंढरीची वारी
मुख्यमंत्र्यांची सकारात्मकता; विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती खूष

फळ्यावर अवघी पंढरी

चित्रकार भदाणे यांनी अवघ्या सहा बाय चार आकाराच्या फळ्यावर अवघी पंढरी व पांडुरंगासह सर्व वारकरी सांप्रदाय दाखवत पंढरपूरची वारी दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com