अब्‍दुल सत्‍तार म्हणतात ‘तो’ व्हिडीओ बनावट; विरोधकांकडून शांतता भंग करण्याचा प्रयत्न

अब्‍दुल सत्‍तार म्हणतात ‘तो’ व्हिडीओ बनावट; विरोधकांकडून शांतता भंग करण्याचा प्रयत्न
अब्‍दुल सत्‍तार म्हणतात ‘तो’ व्हिडीओ बनावट; विरोधकांकडून शांतता भंग करण्याचा प्रयत्न
Abdul SattarSaam tv

धुळे : राज्याचे महसूल ग्रामविकास मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार याचा पक्षकार्य विधान केल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. यावरून विरोधकांनी देखील पालकमंत्र्यांना चांगलेच धारेवर धरले आहे. या विधानावर उत्तर देताना पालकमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी हा व्हिडिओ बनावट करण्यात आला असल्याचे म्हणत विरोधकांनी 2012 पासून बनावट व्हिडिओचा वापर करून सामाजिक शांतता भंग करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जात असल्याचा आरोप लावत या व्हिडिओवर पालकमंत्र्यांनी खुलासा केला आहे. (dhule news Abdul sattar says viral video is fake)

औरंगाबाद येथे होत असलेल्या राज ठाकरे यांच्या सभे संदर्भात बोलताना मंत्री अब्दुल सत्तार यांनी कुठल्याही पक्षाच्या नेत्याला सभा घेण्याचा अधिकार आहे. आपल्या पक्षाचे धोरण जनतेसमोर जरूर मांडावी; परंतु आपल्या विधानाने जातीय तेढ निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी. असे म्हणत कोणी काहीही वक्तव्य केले तर त्याची सत्यता जनतेने तपासून बघावी आणि आजच्या सभेमध्ये राज ठाकरे जे काही बोलतील त्याच प्रतिउत्तर आमचे पक्षप्रमुख पुढील सभेमध्ये जरूर देतील असे देखील मंत्री अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केले आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.