अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे धुळ्यात राज्य सरकारचा निषेध

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे धुळ्यात राज्य सरकारचा निषेध
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे धुळ्यात राज्य सरकारचा निषेध

भूषण अहिरे

धुळे : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे विद्यार्थी आक्रमक झाल्याचे बघावयास मिळाले आहे. गेल्या दोन वर्षांपासून एमपीएससी परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊन देखील अद्यापही शासकीय सेवेमध्ये सामावून घेतलेले नाही. (abvp-aaghadi-goverment-protests-against-the-state-government-in-Dhule)

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे धुळ्यात राज्य सरकारचा निषेध
आईचा खून करुन काळीज खाणा-यास न्यायालयाने सुनावली फाशी

एमपीएससी परीक्षेत पास होवून नोकरी मिळत नसल्‍याने उमेदवार बेरोजगार आहेत. विशेष म्‍हणजे उत्‍तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांवर नैराशेचे ढग ओढावले असून याचा विपरीत परिणाम म्हणून स्वप्निलसारख्या विद्यार्थ्यांना आत्महत्येचा मार्ग देखील निवडावा लागत आहे.

स्‍वप्‍नीलच्‍या आत्‍महत्‍येच्‍या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी त्याचबरोबर स्वप्नीलच्या आत्महत्येनंतर राज्य सरकारच्या निष्क्रियपनाचा निषेध व्यक्त करण्यासाठी धुळ्यातील सावरकर पुतळ्याजवळ अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांनी राज्य सरकारच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करीत तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com