शिरपूर तालुक्यात मोठी कारवाई; सव्‍वादोन लाखाचा गांजा जप्‍त

शिरपूर तालुक्यात मोठी कारवाई; सव्‍वादोन लाखाचा गांजा जप्‍त
cannabis
cannabis

धुळे : शिरपूर तालुक्यातील दुर्गम भागातील सुळे, भोरखेडा शिवारात वनजमिनीवरील गांजाच्या शेतावर तालुका पोलिसांनी कारवाई केली. यात सव्वा दोन लाखांचा ११२ किलो गांजाची झाडे जप्त करण्यात आली. याप्रकरणी अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (dhule-news-action-in-Shirpur-taluka-police-Seized-cannabis-worth)

शिरपूर तालुक्यातील लाकड्या हनुमान गावाचे पुढे पीरपाण्यापाडा ते सोज्यापाडा या कच्च्या रस्त्यालगत शेतात गांजा सदृश्य अंमली पदार्थाच्या वनस्पतीची बेकायदेशीरपणे लागवड केली होती. याबाबतची गुप्त माहिती तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाट यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी शिरपुर पोलीस ठाण्याचे एक पथक तयार केले.

डोंगराळ भागात लागवड

सदर ठिकाण हे अतिशय दुर्गम अशा डोंगराळ भागात असल्याने पथकाला काही अंतर मोटारसायकलीवर जावे लागले. सदरचे ठिकाण हे परिमंडळ सुळे येथील नियतक्षेत्र भोरखेडा येथील कंपार्टमेंट क्रमांक १०२० येथील वनक्षेत्र जमिनीवरील एका शेतात होते. सांयकाळी पाच वाजेच्या सुमारास पथक तेथे पोहचले. तेथे शेतात गांजा सदृश्य अंमली पदार्थ वनस्पतीचे झांडाची लागवड केलेली दिसून आली. शेतात एक ते अडीच फुटांपर्यंतची झाडे दिसून आली. ती उपटून एकुण ११२ किलो गांजाची झाडे जप्त करण्यात आली. त्याची किंमत २ लाख २५ हजार ६०० रूपये इतकी आहे.

cannabis
साडेपाच लाखांचा अवैध लाकूडसाठा जप्त

अज्ञाताविरूद्ध गुन्‍हा दाखल

याप्रकरणी कुंदन पवार यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीवर एनडीपीएस कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पीएसआय दीपक वारे करीत आहेत. सदर कारवाई पोलीस अधिक्षक चिन्मय पंडीत, अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत बच्छाव व उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल माने यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सुरेश शिरसाठ, दिपक वारे, लक्ष्मी करनकाळ, लक्ष्मण गवळी, पोहेकॉ हेंमत पाटील, संजय देवरे, सईद शेख, कुंदन पवार, योगेश दाभाडे, योगेश मोरे, प्रकाश भिल, संतोष पाटील तसेच वनविभागाचे स्वाती गवरे, वनपरिक्षेत्र अधिकारी सांगवी व वनरक्षक अनिल पाटील व ज्ञानेश्वर शिरसाठ यांनी केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com