शाळेला चाललो आम्‍ही..धुळ्यातील ग्रामीण भागात शाळा सुरू

शाळेला चाललो आम्‍ही..धुळ्यातील ग्रामीण भागात शाळा सुरू
शाळेला चाललो आम्‍ही..धुळ्यातील ग्रामीण भागात शाळा सुरू
dhule school opendhule school open

भूषण अहिरे

धुळे : कोरोनामुळे शाळा बंदच होत्‍या. नवीन वर्ष सुरू होवून देखील कोरोनामुळे शाळा कधी सुरू होणार याबाबत प्रश्‍नचिन्‍ह होते. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्‍याने कोरोनामुक्‍त असलेल्‍या गावांमध्‍ये शाळा सुरू करण्याचे आदेश दिले. त्‍यानुसार ग्रामीण भागात शाळा सुरू झाल्‍या आहेत. अनेक दिवसानंतर शाळेचा ड्रेस परिधान करून विद्यार्थी शाळेत आले. (dhule-news-after-coronavirus-lockdown-school-open-today-student-entry-in-social-destancy)

प्रशासनाने कोरोनामुक्त असलेल्या गावात १५ जुलैपासून शाळा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार मागील काही दिवसांपासून गावागावात ठराव करण्यात येत होते. आतापर्यंत धुळ जिल्ह्यात महापालिका, नगरपालिका क्षेत्र वगळता इयत्ता ८ वी ते १२ पर्यंत २९२ शाळा सुरू करण्याच्या संदर्भात अहवाल विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख यांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे सादर केले आहेत.

विद्यार्थ्यांचा उत्‍साह अन्‌ शाळेची काळजी

धुळे तालुक्यातील नगाव या ठिकाणी असलेल्या श्री अण्णासाहेब द. वा. पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये आज सकाळपासूनच शाळा प्रशासनातर्फे विद्यार्थ्यांच्या संदर्भातील सर्व काळजी घेण्यात येत आहे. त्या बरोबरच विद्यार्थ्यांचा देखील उत्स्फूर्त असा प्रतिसाद यावेळी बघावयास मिळाला आहे. पहिल्याच दिवशी मोठ्या संख्येने विद्यार्थी देखील उपस्थित असल्याचे दिसून आले.

dhule school open
कपाटाचे कुलूप दुरूस्‍ती करताना सावधान; साक्री तालुक्‍यात घडलाय असा प्रकार

प्रवेशद्वारावरच तपासणी

शाळा प्रशासनातर्फे सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळत शाळा सुरू करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांसाठी त्याचबरोबर थर्मामीटर किंवा ऑक्सिमीटर या संदर्भात सर्व परीने काळजी शाळा प्रशासनातर्फे घेण्यात येत आहे. या सर्व सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळत विद्यार्थ्यांना वर्गामध्ये प्रवेश दिला जात आहे.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com