Dhule Corporation News: वाढीव घरपट्टी धोरणा विरोधात ज्येष्ठ नागरिक संघटनेचे आंदोलन

वाढीव घरपट्टी धोरणा विरोधात ज्येष्ठ नागरिक संघटनेचे आंदोलन
Dhule Corporation News
Dhule Corporation NewsSaam tv

धुळे : धुळे महानगरपालिकेच्या वाढीव घरपट्टी धोरणा विरोधामध्ये अखिल भारतीय जेष्ठ नागरिक (Dhule News) महासंघ संघटनेचे पदाधिकारी व ज्येष्ठ नागरिक पालिका प्रशासनाच्या विरोधात आक्रमक झाल्याचे बघावयास मिळाले आहे. महापालिका (Dhule Corporation) प्रशासनाच्‍या विरोधात आंदोलन करत याचा निषेध केला आहे. (Maharashtra News)

Dhule Corporation News
Baramati News: शेतजमिनीचा वाद; तहसील कार्यालय आवारात शेतकऱ्याने घेतले पेटवून

धुळे महानगरपालिकेत सध्या मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप लावत नागरिकांना विश्वासात न घेता तसेच कुठल्याही प्रकारची पूर्वसूचना न देता हा सुलतानी निर्णय लादला. असा आरोप या संतप्त ज्येष्ठ नागरिकांनी लावला आहे. पालिका प्रशासनाने निर्णय बदलला नाही, तर मुख्यमंत्र्यांपर्यंत आंदोलन नेण्याचा इशारा यावेळी या संतप्त ज्येष्ठ नागरिकांनी मालिका प्रशासनाला दिला आहे.

Dhule Corporation News
Buldhana News: शेगाव तालुक्यातील शेतकरी अजूनही पिकविम्‍यापासून वंचित; कोट्यावधी रुपयांचा पीकविमा बाकी

धुळे महापालिका प्रशासनाची मनमानी सुरू असल्याचा आरोप यावेळी संघटनेच्यावतीने ज्येष्ठ नागरिकांनी लावला. या विरोधात पालिका इमारतीच्या प्रवेशद्वाराच्या पायऱ्यांवर उभे राहून या संतप्त ज्येष्ठ नागरिकांनी पालिका प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करून निषेध व्यक्त केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com