भाजपचे वस्त्रहरण रोखण्यासाठी नाथाभाऊंसाठी ईडीचा वापर; गोटेंचा फडणविसांवर आरोप

खडसेंची होत असलेली ईडीची चौकशीबाबत अनिल गोटे यांनी पत्रक काढत फडणवीस यांच्‍यावर निशाणा साधला आहे.
भाजपचे वस्त्रहरण रोखण्यासाठी नाथाभाऊंसाठी ईडीचा वापर; गोटेंचा फडणविसांवर आरोप
anil gote devendra fadnavis

भूषण अहिरे

धुळे : राष्‍ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या जावयावर व खडसेंवर इडीकडून होत असलेली वारंवार चौकशी होत आहे. मुळात भाजपचे वस्त्रहरण रोखण्यासाठी नाथाभाऊंसाठी सी.बी.आय ईडीचा सर्रास गैरवापर करत असल्‍याचा आरोप धुळ्याचे माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला आहे. याबाबत पत्रक काढून गोटेंनी पुन्हा एकदा फडणवीसांवर निशाणा साधला आहे. (dhule-news-anil-gote-publish-later-against-devendra-fadnavis-and-bjp-eknath-khadse-matter)

भोसरी येथील जमिन खरेदी प्रकरणी खडसे यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. या प्रकरणात खडसे यांचे जावईस अटक झाली आहे. खडसेंची होत असलेली ईडीची चौकशीबाबत अनिल गोटे यांनी पत्रक काढत फडणवीस यांच्‍यावर निशाणा साधला आहे.

anil gote devendra fadnavis
कुटुंब गाढ झोपेत अन्‌ काळोख्या रात्रीत कोब्राच्‍या थराराने श्‍वास रोखला

काय म्हटलेय पत्रकात

भाजपच्या धृतराष्ट्रासह सर्व कौरवांचा एकाच तासात हिशोब चुकता ! 'चूक भूल, देणे घेणे'. भाजपचे वस्त्रहरण रोखण्यासाठी नाथाभाऊंसाठी सी.बी.आय ईडीचा सर्रास गैरवापर. फडणवीसांच्या अहंकारी व पावर हंग्री, उतावळेपणामुळे महाराष्ट्र भाजपला बाहेरच्या शत्रूची आवश्यकता नाही. तसेच आत्मघात करून घेण्याची फडणवीस यांना अनन्यसाधारण शक्ती प्राप्त..असे म्हणत गोटे यांनी नाथाभाउंवर होत असलेली ईडीची कारवाई म्हणजेच भाजपतर्फे सुडाचे राजकारण केले जात असल्याचा आरोप लावला आहे.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com