प्रवासी वाहतुकीवरून मारहाण; खासगी बस वाहकाचा मृत्यू

प्रवासी वाहतुकीवरून मारहाण; खासगी बस वाहकाचा मृत्यू
प्रवासी वाहतुकीवरून मारहाण; खासगी बस वाहकाचा मृत्यू
death

शिरपूर (धुळे) : प्रवासी वाहतुकीच्या वादातून झालेल्या मारहाणीत खासगी बसच्या (Private Bus) वाहकाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (ता. २४) दुपारी साडेचारला महामार्गावर शिरपूर (Shirpur) फाट्यावर घडली.

death
धुळे व नंदुरबार विधानपरीषदेच्‍या निवडणुकीत एक अर्ज अवैध

योगेंद्रसिंह सिसोदिया (रा. राजघाट रोड, बडवानी, मध्य प्रदेश) असे मृत वाहकाचे नाव आहे. बुधवारी सायंकाळी सेंधवा (मध्य प्रदेश) येथील खासगी रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. त्याच्यासोबत असलेला चालक विक्रमसिंह चव्हाण याने घडलेल्या प्रकाराबाबत सेंधवा पोलिसांना माहिती दिली. धुळे ते बडवानी अशी प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी बसवर विक्रमसिंह व योगेंद्रसिंह अनुक्रमे चालक आणि वाहक म्हणून कार्यरत होते. सायंकाळी ते धुळे येथून प्रवासी घेऊन निघाले असताना शिरपूर फाट्यावर बसला काही प्रवाशांनी हात दाखवून थांबवले.

बसमध्‍ये चढून मारहाण

प्रवासी बसमध्ये चढत असतानाच तेथे उपस्थित खासगी मॅक्स चालकांनी त्याला हरकत घेतली. वाद वाढत जाऊन एकाने बसमध्ये चढून योगेंद्रसिंहला मारहाण केली. छातीवर जबर मार लागल्याने त्याची प्रकृती अत्यवस्थ झाली. ते पाहून चालक विक्रमसिंहने प्रवासी उतरवून देत बस पुढे नेली. पळासनेर येथे खासगी डॉक्टरकडे तपासणी करून योगेंद्रसिंहने औषध घेतले. तेथून बस पुढे निघाली. मात्र, त्रास वाढल्यामुळे सेंधवा येथे खासगी रुग्णालयात बस नेऊन योगेंद्रसिंहला दाखविण्यात आले. त्यादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे संबंधित डॉक्टरांनी रुग्णालयात दाखल करून घेण्यास नकार दिला. याबाबत माहिती मिळाल्यानंतर सेंधवा येथील वरिष्ठ पोलिस अधिकारी रुग्णालयात पोचले. पुढील कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com