Dhule: कुटुंबातील पाच जणांचा सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न; सर्वांची प्रकृती चिंताजनक

कुटुंबातील पाच जणांचा सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न; सर्वांची प्रकृती चिंताजनक
Dhule: कुटुंबातील पाच जणांचा सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न; सर्वांची प्रकृती चिंताजनक
Attempted suicidesaam tv

धुळे : धुळे तालुक्यातील अवधान गावातील दौलत नगरात राहणाऱ्या एकाच कुटुंबातील पाच सदस्यांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना सोमवारी (ता. 21) सायंकाळी घडली. यात अल्पवयीन मुलांसह आई-वडिलांनी विष प्राशनातून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांच्यावर हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या (Dhule Medical Collage) जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (dhule news Attempted mass suicide of five members of family)

Attempted suicide
विद्यार्थ्याकडूनही लाच; वस्तीगृहात प्रवेशासाठी मागितले पाच हजार

धुळे (Dhule) तालुक्यातील अवधान गावातील दौलत नगरात राहणाऱ्या एकाच कुटुंबातील चौघांसह अन्य एक अशा पाच जणांनी एकाच वेळी विष प्राशन करून सामुहीक आत्महत्या (Suicide) करण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. सोमवारी सायंकाळी गणेश गोपाळ याच्यासह पत्नी सविता (वय ३५), मुलगी जयश्री (वय १४), मुलगा गणेश (वय १२) आणि भरत पारधी (वय २४) यांनी घरी विष प्राशन केले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून पाचही चार जणांना परिसरातील नागरिकांनी तात्काळ शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

कौटुंबिक कलह

सदर कुटुंबीय शिरपूर (Shirpur) तालुक्यातील असून अवधान येथील दौलतनगरात गेल्या काही दिवसांपूर्वीच भाड्याचे घर घेऊन राहत होते. या पाचही जणांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे या कुटुंबीयांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न का केला? याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र पती- पत्नीचा प्रेम विवाह व त्यातून होणाऱ्या कलहातून या पाचही जणांनी विष प्राशन केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com