Dhule News: पाच– सहा गावगुंडांची एकास मारहाण; संपुर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद

पाच– सहा गावगुंडांची एकास मारहाण; संपुर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद
Dhule News
Dhule NewsSaam tv

धुळे : साक्रीमध्ये गाव गुंडांना पोलिसांचा धाक उरला नाही का? असाच काहीसा प्रश्न सीसीटीव्ही (CCTV) फुटेजमध्ये कैद झालेल्या मारहाणीनंतर उपस्थित होत आहे. एका इसमास हॉटेलजवळ बोलावून त्‍यास मारहाण (Dhule News) केल्‍याचा प्रकार समोर आला आहे. (Letest Marathi News)

Dhule News
Hinganghat Crime: तरूणीनं भेटण्यास नकार दिल्यानं प्रियकर चिडला; पुढे घडले ते अंगाचा थरकाप उडवणारं

साक्री येथील एका बियर बार समोर बोलावून पाच ते सहा गावगुंडांनी भगवान मारणर या 38 वर्षीय इसमास लाथा बुक्क्यांनी त्याचबरोबर हातात मिळेल त्या हत्याराने जबर मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या संपूर्ण मारहाणीच्या घटनेचा प्रकार जवळच असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाला आहे. पाच ते सहा गावगुंडांनी भगवान मारनर यांना जबर मारहाण केल्यानंतर त्यांना तिथेच सोडून त्यांनी पोबारा केला. परिसरातील नागरिकांनी तात्काळ भगवान मारनर यांना शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले.

दहा दिवसानंतरही कारवाई नाही

त्यानंतर भगवान मारणर यांनी साक्री पोलीस स्टेशन गाठत या संदर्भातील संपूर्ण माहिती दिली. परंतु या घटनेस जवळपास दहा दिवस उलटून देखील अद्यापही पोलिस प्रशासनातर्फे या गावगुंडांना कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही. या गावगुंडांकडून जिवितास धोका असून पोलीस प्रशासनातर्फे तात्काळ या गावगुंडांना ताब्यात घेत, यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी भगवान मारणर यांच्यातर्फे करण्यात आली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com