चालिसा पठण करण्यापूर्वीच मनसे कायकर्ते ताब्‍यात

चालिसा पठण करण्यापूर्वीच मनसे कायकर्ते ताब्‍यात
चालिसा पठण करण्यापूर्वीच मनसे कायकर्ते ताब्‍यात
Dhule MNS News in Marathi, loudspeaker controversy newsSaam tv

धुळे : राज्‍यात भोंगा प्रकरण चांगलेच तापले आहे. यात धुळे शहरात विविध ठिकाणी मनसे कार्यकर्त्यातर्फे भोंग्यावरून हनुमान चालीसा पठण करण्याची तयारी होती. परंतु, चालिसा पठण करण्यापूर्वीच पोलिसांनी (Police) मनसे कार्यकर्त्यांना ताब्‍यात घेतले. (dhule news Before reciting hanuman Chalisa MNS activists were arrested)

Dhule MNS News in Marathi, loudspeaker controversy news
Nandurbar: युवतीचा मृतदेह आढळल्याने खळबळ; दोन दिवसांपुर्वी हत्‍या झाल्‍याचा अंदाज

मनसेच्यावतीने दिलेल्या भोंगा काढण्याबाबतच्‍या इशारानंतर राज्‍यभरात वातावरण तापले आहे. सकाळपासूनच मनसेचे कार्यकर्ते (Dhule News) भोंग्‍यावरून हनुमान चालिसा पठण करण्याच्‍या तयारीत होते. त्‍यानुसार धुळे शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. (Dhule MNS News)

मनसे कार्यकर्ते ताब्‍यात

धुळे शहरातील विविध ठिकाणाहून मनसे कार्यकर्ते पोलिसांनी ताब्यात घेतले. या विरोधात देखील मनसे कार्यकर्त्यांनी पोलीस प्रशासनाची दडपशाही असल्याचा आरोप केला आहे. तसेच राज्य सरकारच्या विरोधामध्ये मनसे कार्यकर्त्यांनी तीव्र घोषणाबाजी केली.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.