मध्‍यरात्रीनंतर दुचाकी चोरी; सीसीटीव्ही कॅमेरात चोरी कैद

मध्‍यरात्रीनंतर दुचाकी चोरी; सीसीटीव्ही कॅमेरात चोरी कैद
मध्‍यरात्रीनंतर दुचाकी चोरी; सीसीटीव्ही कॅमेरात चोरी कैद
Dhule NewsSaam tv

धुळे : शिरपूर शहरासह संपूर्ण तालुक्यामध्ये दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून असाच एक दुचाकी चोरीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे. शिरपूर शहरातील करवंद नाक्यावरील जय मल्हार हॉटेलसमोर उभी दुचाकी रात्रीच्या सुमारास चोरून नेल्याची घटना हॉटेल बाहेर लावलेल्या सीसीटीव्ही (CCTV) कॅमेरात कैद झाली आहे. (dhule news Bike theft after midnight Theft captured on CCTV camera)

Dhule News
लिलावतीतून बाहेर पडताच नवनीत राणांनी उद्धव ठाकरेंना दिले Open Challenge

नांदर्डे येथील रहिवासी व करवंद येथील माध्यमिक शाळेचे शिक्षक दिलीप गुमान पावरा यांनी शहर पोलीस (Police) ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्‍यांची दुचाकी (क्र. एमएच 18, एपी 1012) सकाळी करवंद नाक्यावरील जय मल्हार हॉटेल समोर उभी करून मित्रासोबत बाहेरगावी गेले होते. दरम्यान उशीरा रात्री 2 वाजेच्या सुमारास आले (Dhule News) असता त्यांना सदर ठिकाणी उभी केलेली दुचाकी आढळून आली नाही. त्यांनी परिसरात रात्री शोध घेतला असता त्यांना दुचाकी मिळून आली नाही.

रात्री पावणे दोनला दुचाकी लंपास

सकाळी हॉटेल समोरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी केली. यात रात्री पावणे दोन वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्ती दुचाकी घेऊन जातांना आढळून आल्याने शहर पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दाखल करण्यात आली असून शिरपूर शहर पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्याचा शोध घेत आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.