माफी मागा अन्‍यथा जनआंदोलन; भाजपचा इशारा

माफी मागा अन्‍यथा जनआंदोलन; भाजपचा इशारा
माफी मागा अन्‍यथा जनआंदोलन; भाजपचा इशारा
DhuleSaam tv

धुळे : अब्दुल सत्तार यांचा आक्षेपार्ह विधान केल्‍याचा व्‍हीडीओ सोशल मिडीयावर व्‍हायरल झाला आहे. या विरोधात भाजप आक्रमक झाले असून सत्‍तार (Abdul Sattar) यांनी जनतेची माफी मागावी अन्यथा आगामी काळात त्‍यांच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणात जन आंदोलन छेडण्याचा इशारा भाजपने (BJP) दिला आहे. (dhule news BJP is aggressive about the viral video of Abdul Sattar)

Dhule
आत्महत्येचे स्टेटस ठेवले अन्‌ युवकाने संपविले जीवन

राज्याचे महसूल ग्रामविकास मंत्री तथा धुळे (Dhule) जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार याचा आक्षेपार्ह विधान केल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. यावरून विरोधकांनी देखील पालकमंत्र्यांना चांगलेच धारेवर धरले आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज भाजप युवा मोर्चातर्फे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पालकमंत्र्यांचा ताफा अडवण्यासाठी तसेच या घटनेचा निषेध करण्यासाठी पालकमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्‍यापुर्वीच आंदोलनकर्ते कार्यकर्त्यांना पोलिसांनी (Police) ताब्यात घेतले आहे.

माफी मागा

ताब्यात घेतलेल्या आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी केलेल्या विधानासंदर्भात त्यांनी तात्काळ जनतेची माफी मागावी अशी मागणी केली आहे. अन्यथा आगामी काळात पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणात जन आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलन कर्त्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांना दिला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.