पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात भाजपचे चाबूक मारो आंदोलन

पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात भाजपचे चाबूक मारो आंदोलन
 BJP
BJPSaam tv

धुळे : पेट्रोल, डिझेलवरील अतिरिक्त टॅक्स कमी न करता राज्यातील महाविकास आघाडी सरकार जनतेचे आर्थिक शोषण करीत असल्याचे म्हणत भाजप (BJP) ओबीसी मोर्चातर्फे आज राज्य सरकारच्या निषेधार्थ चाबूक मारो आंदोलन करण्यात आले. (dhule news BJP whip agitation against petrol and diesel price hike)

 BJP
वृद्ध महिलेचा उष्‍माघाताने मृत्‍यू; शेतात गेल्‍या त्‍या परतल्‍याच नाही!

भाजपशासित राज्यांमध्ये पेट्रोल, डिझेलवरील अतिरिक्त टॅक्स कमी करून दर संतुलित राखण्याचा प्रयत्न (Petrol Price) केंद्र सरकारतर्फे करण्यात आला; असे म्हणत गोव्यामध्ये 97 रुपये, मध्यप्रदेश, उत्तराखंडमध्ये 105 रुपये तर आत्ता महाराष्ट्र राज्यामध्ये केंद्र सरकारला बदनाम करण्यासाठी सर्वसामान्य जनतेला वेठीस धरण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी सरकारतर्फे वाढीव टॅक्स लावून करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा आरोप आंदोलक भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी महाविकास आघाडी (Mahavikas Aaghadi) सरकारवर लावला आहे.

पक्षश्रेष्‍ठींचे चेहरे रावणाच्या प्रतिकृतीत

या वेळी भाजपच्या जमलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पेट्रोल पंपाबाहेर महाविकास आघाडीमधील प्रमुख तीनही पक्षांच्या पक्षश्रेष्ठींचे चेहरे रावणाच्या प्रतिकृतीमध्ये फलकावर साकारून त्यांना चाबूक मारून निषेध आंदोलन केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com