बेरोजगार प्रशिक्षित पशुवैद्यकीय कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून आंदोलन

बेरोजगार प्रशिक्षित पशुवैद्यकीय कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती आंदोलन
बेरोजगार प्रशिक्षित पशुवैद्यकीय कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून आंदोलन

भूषण अहिरे

धुळे : पशुवैद्यकीय पशु संवर्धन दुग्ध व्यवस्थापक सेवा संघाच्यावतीने शहरातील कल्याण भवन येथे बेरोजगार प्रशिक्षित पशुवैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी काळ्या फिती लावून प्रशासनाचा विरोधात घोषणाबाजी करीत आंदोलन करण्यात आले. (dhule-news-Black-ribbon-movement-of-unemployed-trained-veterinary-staff)

गेल्या काही महिन्यांपूर्वी प्रलंबित मागण्यांसंदर्भात बेरोजगार प्रशिक्षित पशुवैद्यकीय कर्मचाऱ्यांनी अर्धनग्न आंदोलन केले होते. त्‍यावेळी शासनाने अटी मान्य करीत आंदोलकांनी मागणी केल्याप्रमाणे बारावीनंतर अडीच ते तीन वर्ष कालावधीचा पशु चिकित्सा शास्त्राचा पदविकास अभ्यासक्रम सुरू करण्याचे आदेश पशुसंवर्धन खाते व पशु व मत्स्य विज्ञान विभागाला दिले होते. परंतु अद्यापपर्यंत यावर कुठल्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही. यामुळे प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराविरोधात आज बेरोजगार प्रशिक्षित पशुवैद्यकिय कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी करीत निषेध व्यक्त केला. यावेळी मोठ्या संख्येने बेरोजगार प्रशिक्षित पशुवैद्यकीय कर्मचारी उपस्थित होते.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com