धुळ्यात महाविकास आघाडीचा रास्ता रोको; लखीमपुर दुर्घटनेचा निषेध

धुळ्यात महाविकास आघाडीचा रास्ता रोको; लखीमपुर दुर्घटनेचा निषेध
धुळ्यात महाविकास आघाडीचा रास्ता रोको; लखीमपुर दुर्घटनेचा निषेध
रास्ता रोको

धुळे : लखीमपूर दुर्घटनेचा निषेध करण्यासाठी आज राज्य सरकारमध्ये सामील असलेल्या तीनही घटक पक्षांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. या दरम्यान घटनेचा निषेध करण्यासाठी धुळे शहरालगत असलेल्या मुंबई- आग्रा महामार्गावरील चाळीसगाव चौफुली याठिकाणी आंदोलकांतर्फे रास्ता रोको करण्यात आला. (dhule-news-Block-the-road-of-Mahavikas-Aghadi-in-Dhule-Protest-against-Lakhimpur-tragedy)

लखीमपूर दुर्घटनेचा निषेध करण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या तिन्ही पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्र येत हा रस्ता रोको करण्यात आला आहे. रास्ता रोको दरम्यान मुंबई- आग्रा महामार्गावरील वाहतुकीचा मोठ्या प्रमाणात खोळंबा झाल्याचे बघावयास मिळाले आहे. रस्त्याच्या दुतर्फा रास्ता रोको दरम्यान वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे बघायला मिळाले. यावेळी रास्तारोको दरम्यान कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये; यासाठी पोलीस प्रशासनातर्फे आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले आहे.

रास्ता रोको
औरंगाबाद: राहत्या घरात प्राध्यापकांची गळा चिरून निर्घृण हत्या

कापडणे, साक्रीतही रास्‍तारोको

जिल्ह्यामध्ये बंद दरम्यान अशीच काहीशी परिस्थिती बघावयास मिळत आहे. धुळे तालुक्यातील कापडणे या ठिकाणीदेखील महाविकास आघाडीच्या घटकपक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्यावतीने रास्ता रोको करण्यात आला. तसेच साक्री तालुक्यात देखील रास्ता रोखो करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.