कंगना राणावतला पाठविली स्‍वातंत्र सैनिकांची पुस्‍तके; धुळ्यातील युवतीकडून निषेध
kangana ranaut

कंगना राणावतला पाठविली स्‍वातंत्र सैनिकांची पुस्‍तके; धुळ्यातील युवतीकडून निषेध

कंगना राणावतला पाठविली स्‍वातंत्र सैनिकांची पुस्‍तके; धुळ्यातील युवतीकडून निषेध

धुळे : भारताच्या स्वातंत्र्यबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्य केले आहे. इतिहासाची माहिती नसलेल्‍या अभिनेत्री कंगना राणावतच्‍या ज्ञानात भर पडेल या उद्देशाने धुळ्यातील कृषिकन्याने स्वातंत्र्य सैनिकांची पुस्तके पोस्टाने भेट पाठवून अनोख्या पद्धतीने निषेध केला आहे. (dhule-news-Books-of-freedom-fighters-post-to-Kangana-Ranaut-Protest-from-young-woman)

kangana ranaut
फेसबुकवर बनावट अकाऊंट; तरूणाची केली बदनामी

भारताच्या स्वातंत्र्यबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर सर्व स्तरातून अभिनेत्री कंगना राणावत हिच्या वक्तव्याचा निषेध केला जात आहे. कंगना राणावत या अभिनेत्रीचा इतिहासाचा अभ्यास अद्याप कमी असल्याचे म्हणत धुळ्यातील कृषिकन्या प्रियंका जोशीने कंगनाला इतिहासाची विविध स्वातंत्र्य सैनिकांची पुस्तके पोस्टाने पाठवून अनोख्या पद्धतीने कंगणाने स्वातंत्र्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध केला आहे.

ज्ञानात भर पडावी म्‍‍हणून कंगनाला पुस्‍तक

कंगना राणावत हिने गेल्या काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात १९४७ मध्ये भारताला मिळालेले स्वातंत्र्य म्हणजेच इंग्रजांनी भारताला दिलेली भीक असे म्हणून सर्व भारतीयांचा रोष ओढवून घेतला आहे. यामुळेच कंगना राणावत या अभिनेत्रीला स्वातंत्र्य सैनिकांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी दिलेल्या बलिदानाची माहिती मिळावी व कंगणाच्या ज्ञानामध्ये भर पडावी यासाठी स्वातंत्र्य सैनिकांची पुस्तके भेट पोस्टाने पाठवून अनोख्या पद्धतीने कंगनाचा निषेध केला आहे. ही पुस्तके वाचल्यानंतर नक्कीच कंगना राणावतच्या ज्ञानामध्ये भर पडेल व भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी स्वातंत्र्यसैनिकांनी कशा पद्धतीने आपल्या प्राणांची आहुती देत भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले याची जाणीव देखील कंगनाला होईल, असं मत धुळ्यातील कृषिकन्या प्रियंका जोशी हिने पुस्तके पोस्ट करताना व्यक्त केल आहे.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com