पूर्वसुचना न देता घरांवर चालविले बुलडोझर

पूर्वसुचना न देता घरांवर चालविले बुलडोझर
पूर्वसुचना न देता घरांवर चालविले बुलडोझर

धुळे : कुठल्याही प्रकारची पूर्वसूचना न देता घरांवर बुलडोझर चालविले. प्रशासनाने केलेल्‍या या प्रकाराच्‍या विरोधामध्ये आबालवृद्धांनी आमरण उपोषण केले. (dhule-news-Bulldozers-driven-into-28-homes-without-prior-notice)

लवाद निकाल न्यायप्रविष्ट असताना देखील कुठल्याही प्रकारची पूर्वसूचना न देता घरांवर बुलडोझर चालवून गोरगरीब नागरिकांचा संसार उघड्यावर आणणाऱ्या प्रशासनाचा निषेध करण्यासाठी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात असलेल्या क्यूमाईन क्लब येथे अबाल वृद्धांसह अमरण उपोषण सुरु केले आहे.

२८ घरांवर बुलडोझर

धुळे तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 जवळील अजंग ग्रामस्थांचे जवळपास 28 घरांवर संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पोलीस फाटा बोलवीत कुठल्याही प्रकारची पूर्वसूचना न देता घरांवर बुलडोझर फिरविला आहे. सकाळी शेतामध्ये कामास गेलेल्या गोरगरीब नागरिकांना संध्याकाळी घरी आल्यानंतर घर जमीनदोस्त झाल्याचे धक्कादायक चित्र पाहावयास मिळाले.

पूर्वसुचना न देता घरांवर चालविले बुलडोझर
गिरणेला महापुर; जामदा बंधाऱ्याचे गेट न उघडल्याने पाणी शेतात

उघड्यावर आलेल्‍यांनी उपोषण

यामुळे या नागरिकांवर भर पावसामध्ये उघड्यावर बालकांसह वयोवृद्धांना घेऊन राहण्याची वेळ आली आहे. या संतप्त ग्रामस्थांनी भर पावसामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात प्रशासनाच्या विरोधामध्ये आमरण उपोषण सुरू केले आहे. जोपर्यंत प्रशासनातर्फे या संदर्भातील या नागरिकांना न्याय दिला जात नाही तोपर्यंत आबालवृद्धांसह हे उपोषण अशाच पद्धतीने सुरु ठेवण्याचा निर्धार या ग्रामस्थांनी ठेवला आहे.

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com