St Strike: खासगी चालकांच्‍या हाती बस; एसटी कर्मचाऱ्यांनी घातला गोंधळ

खासगी चालकांच्‍या हाती बस; एसटी कर्मचाऱ्यांनी घातला गोंधळ
St Strike: खासगी चालकांच्‍या हाती बस; एसटी कर्मचाऱ्यांनी घातला गोंधळ
St Strikesaam tv

धुळे : एसटी कर्मचाऱ्यांचा दोन महिन्‍यांपासून संप सुरू आहे. कर्मचारी कामावर येत नसल्‍याने प्रशासनाने खासगी चालकांना चालवायला बोलाविले. यामुळे प्रशासन प्रवाशांचा जीव धोक्यात टाकत असल्याचा आरोप लावत आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांनी धुळे (Dhule) एसटी आगारात गोंधळ घातला. (dhule news Bus in the hands of private drivers Confusion caused by ST employees)

St Strike
धक्‍कादायक..छेडखानीच्‍या त्रासाने नववीतील मुलीची आत्महत्या

धुळे आगारातून खाजगी वाहन चालकांना बस चालवण्यासाठी कुठल्याही प्रकारचे ट्रेनिंग न देता बस चालवण्यासाठी बोलावण्यात आले. यामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात टाकण्याचे काम प्रशासनातर्फे सुरू असल्याचा आरोप लावत आंदोलन (St Strike) कर्मचाऱ्यांनी धुळे बस आगारामध्ये प्रशासनाच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करून एकच गोंधळ केला.

मग प्रशिक्षण नसलेले चालक का?

प्रशिक्षित एसटी कर्मचारी असताना देखील त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करून कुठलेही प्रकारचे प्रशिक्षण न देता खाजगी वाहन चालकांना एसटी सोपवून प्रवाशांचा जीव प्रशासन जाणीवपूर्वक घालत असल्याचा आरोप यावेळी लावला. याचा आम्ही निषेध करतो; असे म्हणत एसटी आंदोलक कर्मचाऱ्यांनी राज्य शासनाच्या धोरणाचा निषेध केला आहे. यावेळी पोलीस प्रशासनातर्फे हा सर्व गोंधळ थांबविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com