कडेकोट बंदोबस्‍तात बससेवा सुरू; धुळे बसस्‍थानकात गोंधळ

कडेकोट बंदोबस्‍तात बससेवा सुरू; धुळे बसस्‍थानकात गोंधळ
कडेकोट बंदोबस्‍तात बससेवा सुरू; धुळे बसस्‍थानकात गोंधळ
St BusSt Bus

धुळे : एसटी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलगीकरण व्हावे; या मागणीसाठी धुळ्यातील एसटी कर्मचारी जवळपास १४ दिवसांपासून आगारामध्ये संपावर आहेत. सर्व एसटी कर्मचाऱ्यांचे आपल्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. अशा परिस्थितीमध्ये धुळे परिवहन विभागातर्फे यापूर्वीच एसटी भरतीमध्ये निवड झालेल्या परंतु अद्यापपर्यंत सेवेत रुजू करण्यात न आलेल्या कर्मचाऱ्यांना सेवेत रुजू करून घेत बससेवा सुरू करण्यात आली आहे. धुळे एसटी आगारातून एसटी बस बाहेर पडत असताना आंदोलनकर्त्या एसटी कर्मचाऱ्यांचा आक्रोश बघावयास मिळाला आहे. (dhule-news-Bus-service-resumes-under-tight-security)

St Bus
धावत्या बसमध्ये चालकाला हृदयविकाराचा त्रास; प्रसंगावधानाने अनर्थ टळला

मनसेचा विरोध

एसटी कर्मचाऱ्यांचा आक्रोश सुरू असताना एसटी प्रशासनातर्फे बस आगारातून बाहेर काढण्यात आल्या. एसटी कर्मचाऱ्यांच्या या संपाला मनसेतर्फे पाठिंबा देण्यात आला व बस बाहेर काढत असताना मनसेतर्फे विरोध देखील करण्यात आला. परंतु पोलिस प्रशासनातर्फे मनसेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले. पोलिस प्रशासनाच्या कडेकोट बंदोबस्तमध्ये धुळे एसटी आगारातून बसेस बाहेर काढण्यात आल्या आहेत.

त्‍या चालकांच्‍या गळ्यात हार

यादरम्यान एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असताना देखील प्रशासनातर्फे बससेवा सुरू करण्यात आली असून संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी आगारातून बस बाहेर काढणाऱ्या एसटी चालक कर्मचार्‍याच्या गळ्यामध्ये फुल हार टाकून व त्या कर्मचाऱ्यास मिठाई भरवून अनोख्या पद्धतीने प्रशासनाचा निषेध केला आहे. या दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनातर्फे मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com