देशाला लुटण्याचे काम सुरू; चंद्रशेखर आझाद यांचा मोदी सरकारवर निशाणा

देशाला लुटण्याचे काम सुरू; चंद्रशेखर आझाद यांचा मोदी सरकारवर निशाणा
देशाला लुटण्याचे काम सुरू; चंद्रशेखर आझाद यांचा मोदी सरकारवर निशाणा
Chandrasekhar Azad

धुळे : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या संविधानिक अधिकार दिले; त्याचे पालन होत नसून सध्या देशाला लुटण्याचे काम सुरू आहे. देशात मोठ्या प्रमाणात महागाई वाढवली जात असून बाहेरच्या देशांशी टक्कर देण्याआधी देशांतर्गत चाललेले सामाजिक वाद मिटवणे महत्त्वाचे असून त्यानंतरच आपण सामाजिक एकात्मता बाळगून बाहेरच्याचा सामना करू शकतो; असे मत व्यक्त करीत चंद्रशेखर आझाद यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. (dhule-news-Chandrasekhar-Azad-targets-Modi-government)

Chandrasekhar Azad
प्रेरणादायी..झोपडपट्टीतील ‘लक्ष्‍मी’ बनली त्‍यांच्‍यासाठी शिक्षिका

आझाद समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रशेखर आझाद आज धुळे दौऱ्यावर आहेत. त्यांनी विविधा मुद्द्यांवरून पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केंद्र सरकार तसेच राज्य सरकारवर देखील निशाणा साधला आहे.

संविधान लागू झाले असले तरी संविधानानुसार जे अधिकार दिले गेले आहेत ते अधिकार मिळविण्यासाठी वंचित समाजास राजकीय ताकद मिळवणे देखील गरजेचे असल्‍याचे देखील त्‍यांनी सांगितले.

त्‍या मंत्र्याने राजीनामा द्यावा

लखीमपूर येथील दुर्घटने विषयी बोलताना आझाद यांनी ज्या केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाने हे कृत्य केले आहे, या घटनेचा तपास सुरू असताना केंद्रीय मंत्र्यांकडून त्यांच्या राजकीय ताकदीचा वापर करून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याने त्यांच्या केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा घेतला जावा. तेव्हाच या दुर्घटनेचा निष्पक्ष तपास यंत्रणेच्या माध्यमातून होणे शक्य आहे. अशी मागणी या वेळी चंद्रशेखर आझाद यांनी पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली आहे.

कायदे मागे घेण्यात पंतप्रधानांचा स्‍वार्थ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पारित केलेले तीन कृषी कायदे सहजासहजी मागे घेतले जात नसून पंजाब हरियाणा या ठिकाणी होत असलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी कृषी कायदे मागे घेतले. या निर्णयाच्या पूर्वी बहुतांश शेतकऱ्यांनी आपला जीव देखील गमावला असून संविधानाने दिलेल्या अधिकाराचा वापर करून अखेर शेतकऱ्यांनी आंदोलनाच हत्यार उपसले. नंतर आता हे कृषी कायदे मागे घेतले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागे घेतलेल्या कृषी कायद्यामुळे एका तानाशाही युगाची समाप्ती सुरू झाली असल्याची टीका केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com