
धुळे : एक वर्ष क्रॉस करताच विधानसभा व लोकसभेच्या निवडणुका सुरू होणार. सणवार सुट्ट्या व पाऊस वगळता आपल्याकडे फक्त दोनशे दिवस शिल्लक आहेत. काम करा व जिल्ह्यात (NCP) राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व उद्धव ठाकरे गटाचे एकही कार्यकर्ते उमेदवारी लढवण्यासाठी शिल्लक ठेवू नका. भाजप पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांना पक्षप्रवेश करून घेण्याचे काम तळागाळातील (BJP) भाजपच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी करण्याचे आवाहन चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. (Dhule News Chandrashekhar Bawankule)
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे आज धुळे दौऱ्यावर आले असता त्यांनी संघटनात्मक बैठक या कार्यक्रमांतर्गत कार्यकर्त्यांशी आपल्या भाषणातून संवाद साधला. या कार्यक्रमादरम्यान मोठ्या संख्येने भाजप ग्रामीणचे कार्यकर्ते उपस्थित असल्याचे बघाच मिळाले आहे. त्याचबरोबर माजी संरक्षण राज्यमंत्री तथा खासदार सुभाष भामरे यांच्यासह माजी मंत्री तथा आमदार जयकुमार रावल, आमदार अमरीशभाई पटेल (Amrish Patel) तसेच धुळे जिल्ह्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, धुळे (Dhule) ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, महापौर प्रदीप कर्पे, माजी महापौर चंद्रकांत सोनार व माजी आमदार राजवर्धन कदमबांडे उपस्थित होते.
लोकसभेत ४५ प्लस
लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या कामाला लागण्याचे आवाहन करत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस (Congress) व आता शिवसेना नाही तर उद्धव गट असे म्हणत हे तीनही पक्ष एकत्र येवू द्या. तरी राज्यामध्ये लोकसभेच्या निवडणुकीत पंचेचाळीस प्लस जागा या मोदीजींच्या नेतृत्वाखाली निवडून देण्याचे आवाहन देखील यावेळी कार्यकर्त्यांशी बोलताना बावनकुळे यांनी भाषणादरम्यान केले आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.