
धुळे : राज्यात सध्या सुरू असलेल्या राजकिय घडामोडीमुळे महाविकास आघाडी सरकार पडणार अशी चर्चा सुरू आहे. अशात भाजप खासदार डॉ. सुभाष भामरे (Subhash Bhamre) यांनी प्रतिक्रीया देताना राज्यातील सत्तेत दोन दिवसात बदल होणार असल्याचे मत मांडले आहे. (dhule news Change of state power in two days statement in BJP MP subhash Bhamre)
राज्यातील विधान परिषदेच्या निवडणूकीत (BJP) भाजपने महाविकास आघाडीला (Mahavikas Aaghadi) धक्का दिला आहे. यामुळे राज्यात भाजप कार्यकर्ते जल्लोष करत आहेत. त्यानुसार धुळ्यात देखील भाजपतर्फे जल्लोष करण्यात आला आहे. माजी संरक्षण राज्यमंत्री तथा भाजपचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या अध्यक्षतेखाली फटाके फोडून जल्लोष करण्यात आला.
शिंदेच्या बंडखोरीनतर जल्लोष
पुढील दोन दिवसात सत्तेत बदल दिसेल असे माजी संरक्षण राज्यमंत्री तथा भाजपचे खासदार सुभाष भामरे यांनी स्पष्ट केले असून भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यालयासमोर जल्लोष केला. प्रामुख्याने शिवसेना मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी केल्यानंतर झालेल्या घडामोडीनंतर धुळ्यात भाजपचा जल्लोष करण्यात आला.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.