धुळ्यावर क्षेत्रीय अधिकाऱ्यांची नजर; शिथिल निर्बंधांबाबत वेळोवेळी होणार पाहणी

धुळ्यावर क्षेत्रीय अधिकाऱ्यांची नजर; शिथिल निर्बंधांबाबत वेळोवेळी होणार पाहणी
धुळ्यावर क्षेत्रीय अधिकाऱ्यांची नजर; शिथिल निर्बंधांबाबत वेळोवेळी होणार पाहणी

धुळे : शहरातील अत्यावश्यक सेवेतील दुकाने व इतर आस्थापना अटीशर्थींची तंतोतंत अंमलबजावणी करीत आहेत किंवा नाहीत याची पाहणी, तसेच शासन नियमाप्रमाणे प्रभावी अंमलबजावणी होते किंवा कसे याचीही वेळोवेळी पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी सोमवारी २० क्षेत्रीय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली. ते महापालिका क्षेत्रात निर्धारित वेळेनंतर अत्यावश्यक सेवा वगळून असलेली दुकाने व आस्थापनांवर नजर ठेवतील. त्यातील दोषींवर कारवाईची शिफारस करतील. (dhule-news-collector-jalaj-sharma-Regional-officials-keep-an-eye-on-Dhule)

शासनाने कोरोनाची रूग्णसंख्या अत्यंत कमी झालेल्या क्षेत्रात सोमवार ते शुक्रवार सकाळी सहा ते रात्री आठपर्यंत, शनिवारी दुपारी तीपर्यंत परवानगी आणि रविवारी संपूर्ण दिवस अत्यावश्‍यक सेवा वगळता इतर आस्थापना, व्यवसायांना निर्बंध घातले आहेत. असे असले तरी या नियमांचे काटेकोरपणे पालन होत नसल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर शहर कार्यक्षेत्रासाठी नियुक्ती झालेल्यांची नावे (अनुक्रमे नाव, मोबाईल क्रमांक, पदनाम, कार्यालयाचे नाव, नियुक्ती क्षेत्र) अशी : चंद्रकांत ठाकरे (९४२३९ ८१५८४) व गणपत ढोंगाडे (७५८८० ३८९२५), तांत्रिक अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, मोहाडी, एमआयडीसी, अवधान ते शासकीय डेअरी परिसर, धुळे परिसर. ए. पी. परमार (९४०४४ १४४९४), विभागीय अभियंता, मोहन भदाणे (८३२९३ ४०२२७), सहाय्यक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, चितोड रोड, अग्रवालनगर, चाळीसगाव रोड, पवननगर परिसर. स्वानंद पाटील, सहाय्यक अभियंता, पाटबंधारे विभाग, जी. के. चौधरी (९४२३५ १७९७४), तांत्रिक अधिकारी, उपविभागिय कृषी अधिकारी कार्यालय, सिंधी कँप, मोगलाई, साक्री रोड, गोळीबार टेकडी, अग्रवाल भवन परिसर. प्रशांत भोसले (९८५०८ ५४०३९), कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग ११, अविनाश सोनवणे (९४२१४ ४४४५४), जिल्हा माती व पाणी परीक्षण अधिकारी, धुळे पाटबंधारे कार्यालय, जुने धुळे, बडगुजर कॉलनी, प्रकाश टॉकीज, परिसर. व्ही. एफ. पवार (९४२२३ ६४७९०), सहायक अभियंता, लघु पाटबंधारे विभाग, विकास लोकरे (८३९०३ ९८२५२), कनिष्ठ शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग (आदिवासी उपविभाग), जुना आग्रा रोड, ग. नं. १ ते ६ परिसर. किशोर राव (९४२२५ ८४३७१), शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, कैलास गाडेकर (९८९०८ ६२५८२), शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, डोंगरे महाराज नगर, कॉटन मार्केट, नटराज टॉकीज, आझादनगर, हजारखोली, वडजाई रोड परिसर. प्रकाश जाधव (९८३४४ ३७४७५), राज्यकर निरीक्षक, राज्यकर उपायुक्त वस्तू व सेवाकर भवन, रावत अमन (९७१३६ ७९२००), कनिष्ठ अभियंता, उपविभागीय मध्य तापी पाणी नियंत्रण समिती, पाटबंधारे विभाग, प्रमोदनगर सर्व सेक्टर, नकाणे रोड, वलवाडी परिसर. बी. आर. बोरसे, शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग, जावेद इक्बाल जमील अहमद शेख (८९८३८ ९९९१९), समाजकल्याण निरीक्षक, जिल्हा समाजकल्याण कार्यालय, शासकीय स्टेडियम, बोरसेनगर, पंचायत समिती, जयहिंद वरीष्ठ महाविद्यालय ते जयहिंद जलतरण तलाव परिसर. बी. व्ही. वानखेडे (९४२१२ ३२९२४), क्षेत्रीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग (आदिवासी विभाग), शशिरंजन श्रीवास्तव (९४२०६ ६३१४५), विभागीय अभियंता, तापी पाटबंधारे उपविभाग, मध्यम प्रकल्प, पाटबंधारे विभाग, जयहिंद हायस्कूल ते मोचीवाडा, नुरानी मशीद, जुने देवपूर पोलिस ठाणे, वीटभट्टी परिसर. सागर सोनवणे (७७७६० १६६००), उदय देवरे (८६००२ ८६४०७), राज्य कर निरीक्षक राज्यकर उपायुक्त वस्तू व सेवाकर भवन, दत्त मंदिर, जीटीपी कॉलनी, स्वामी नारायण मंदिर, आकाशवाणी केंद्र, नगावबारी परिसर.

धुळ्यावर क्षेत्रीय अधिकाऱ्यांची नजर; शिथिल निर्बंधांबाबत वेळोवेळी होणार पाहणी
बीएचआर घोटाळा; मुख्य संशयित झंवरला नाशिक येथून अटक

नियमांचे पालन आवश्‍यक

धुळेकरांनी मास्क, शारिरीक अंतर, सॅनेटायझरचा वापर करणे आवश्‍यक आहे. याबाबत, तसेच वाहतूक नियंत्रणाबाबत व्हीडीओ चित्रीकरण करुन तसा दैनंदिन अहवाल सहायक जिल्हाधिकारी तथा प्रांताधिकारी, अपर तहसीलदारांना सादर करतील. त्यांनी तो दंडात्मक कार्यवाहीसाठी मनपा आयुक्तांना पाठवावा. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरूध्द विविध कलमांन्वये कायदेशीर कारवाई करावी, अशी सूचना आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com