दलितांच्या विविध प्रश्नांवर राज्य, केंद्र सरकारच्या विरोधात धरणे

दलितांच्या विविध प्रश्नांवर राज्य, केंद्र सरकारच्या विरोधात धरणे
दलितांच्या विविध प्रश्नांवर राज्य, केंद्र सरकारच्या विरोधात धरणे

भूषण अहिरे

धुळे : दलितांच्या विविध प्रलंबित मागण्या त्याचबरोबर दलितांवर होत असलेल्या अन्याय अत्याचार व राज्य सरकारने हुकूमशाही पद्धतीने मागासवर्गीयांच्या पदोन्नती आरक्षणाबाबत घेतलेला निर्णया विरोधात बहुजन समाज पार्टीतर्फे धुळ्यात एक दिवसाचे धरणे आंदोलन करण्यात आले आहे. (dhule-news-collector-office-dalit-reservation-matter-dharne-aandolan)

राज्य सरकारने व केंद्र सरकारने महागाईविरोधात कुठल्याही पद्धतीची ठोस उपाय योजना केली नसून वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री बसत असून राज्य सरकार व केंद्र सरकार हे दोन्ही महागाई वाढीसाठी जिम्मेदार असल्यामुळे याचा देखील निषेध बहुजन समाज पार्टीच्यावतीने करण्यात आला आहे.

दलितांच्या विविध प्रश्नांवर राज्य, केंद्र सरकारच्या विरोधात धरणे
शाळा सुरूबाबत हवाय ग्रामपंचायतींचा ठराव; शिक्षण विभागाला अजूनही प्रतिक्षा

आरक्षणाचा मुद्दा निकाली काढावा

ओबीसींच्या राजकीय आरक्षण हा फक्त आणि फक्त राजकीय मुद्दा बनविला जात असल्याचा देखील आरोप यावेळी आंदोलनकर्त्यांनी राज्य व केंद्र सरकारवरती लावला असून याबाबत ठोस भूमिका घेऊन ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा निकाली काढावा; अशी देखील मागणी या वेळी बहुजन समाज पार्टीच्या आंदोलनकर्त्यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आले असून या सर्व बाबींना केंद्र व राज्य सरकार जिम्मेदार असल्यामुळे दोघांचाही निषेध करण्यासाठी एक दिवसाचे धरणे आंदोलन बहुजन समाज पार्टीच्यावतीने धुळ्यात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात असलेल्या क्यूमाईन क्लब परिसरामध्ये करण्यात आले आहे.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com