
धुळे : साक्री तालुक्यातील ज्ञानेश्वर सोनवणे या कला शिक्षकाने आपल्या चित्रकलेसह आणखी एक कला जोपासली आहे. या कलेची चर्चा सध्या संपूर्ण जिल्हाभर सुरू आहे. ज्ञानेश्वर सोनवणे यांनी चक्क नखचित्रकलेतून आपल्या नखांच्या साहाय्याने (Dhule News) संपूर्ण भगवत गीताच साकारली आहे. भगवत गीतेतील 1400 ओळींचे 700 श्लोक सोनवणे यांनी साकारले आहेत. ही भगवतगिता साकारायला त्यांना तब्बल दोन वर्षांचा कालावधी लागला आहे. या कलेची दखल गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड व लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये घेतली जाईल असा विश्वास देखील ज्ञानेश्वर सोनवणे यांनी व्यक्त केला आहे. (dhule news Complete Bhagavad Gita realized through drawing teacher)
साक्री (Sakri) तालुक्यातील तामसवाडी येथील रहिवासी व शिंदखेडा तालुक्यातील माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय जखाणे या विद्यालयात कला शिक्षक (Shindkheda) म्हणून कार्यरत असलेल्या ज्ञानेश्वर भिमराव सोनवणे यांनी आपल्या नख चित्रकलेच्या माध्यमातून भगवतगितेतील 1400 ओळींचे 700 श्लोक साकारले आहेत. ही भगवतगिता साकारायला त्यांना तब्बल दोन वर्षांचा कालावधी लागला आहे.
लागला दोन वर्षाचा कालावधी
भगवत गीता नखचित्रकलेच्या माध्यमातून सकरण्यास ज्ञानेश्वर सोनवणे यांनी पहिल्या लॉकडाऊनच्या (Lockdown) आधी सुरुवात केली होती. दिवसाचे सात ते आठ तास या कामासाठी ते वेळ देत होते. एक श्लोक लिहायला सलग बैठक मारली तरी दीड ते दोन तास लागत असे. भगवत गीता नखचित्राच्या माध्यमातून रेखाटण्यापूर्वी ज्ञानेश्वर सोनवणे यांनी महापुरुषांचे देखील चित्र नखचित्राच्या माध्यमातून हुबेहूब रेखाटले आहे. याआधी असा प्रयोग कुठेही झालेला नाही, याची सोनवणे यांना खात्री आहे. त्यामुळे नख चित्रकला ही दुर्मिळ समजली जाणारी कला आहे. अंगठा व मधले दोन बोटांच्या नखांची ठराविक वाढ करुन नखचित्र साकारली जातात. अतिशय नाजूक आणि काळजीपूर्वक ही नखचित्रे रेखाटली जातात.
परिवाराचीही साथ
नखचित्राच्या माध्यमातून भगवद्गीता साकारत असताना दिवसभरातील महत्त्वाचा वेळ हा कामानंतर परिवाराला देणे अपेक्षित असताना अशावेळी परिवाराला हा वेळ न देता ज्ञानेश्वर सोनवणे यांनी आपली कला जोपासण्यात घालवल्यानंतर परिवारातर्फे देखील ही कला जोपासत असताना कुठल्याही प्रकारची तक्रार न करता त्यांच्या धर्मपत्नीने देखील त्यांना भक्कम पणे साथ दिली आहे. आपल्या पत्नीच्या पाठिंब्यामुळेच आपण भगवद्गीता नखचित्राच्या माध्यमातून जवळपास दोन वर्षाचा कालावधी घेऊन साकारू शकलो असल्याचे ज्ञानेश्वर सोनवणे यांनी स्पष्ट केले आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.