भिमस्‍मृती यात्रोत्‍सव रद्द; लळींग भुमीवर ३१ जुलैला दरवर्षी होतो उत्‍सव

भिमस्‍मृती यात्रोत्‍सव रद्द; लळींग भुमीवर ३१ जुलैला दरवर्षी होतो उत्‍सव
भिमस्‍मृती यात्रोत्‍सव रद्द; लळींग भुमीवर ३१ जुलैला दरवर्षी होतो उत्‍सव

धुळे : मोहाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असलेल्या किल्ले लळींग येथे दरवर्षी साजरा होणारा भीमास्मृती यात्रा प्रशासनातर्फे बंद ठेवण्यात येणार आहे. याबाबत बैठक घेवून निर्णय घेण्यात आला. (dhule-news-corona-effect-Bhimasmriti-Yatra-festival-canceled)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली लळिंग भूमी येथे दरवर्षी ३१ जुलैला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी भीमसैनिक जमा होत असतात. परंतु कोरोनाचे सावट असल्याच्‍या कारणाने मोहाडी पोलिसांतर्फे भीम सैनिकांना एकत्र न जमण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

भिमस्‍मृती यात्रोत्‍सव रद्द; लळींग भुमीवर ३१ जुलैला दरवर्षी होतो उत्‍सव
..तर ठेलारी संघटनेतर्फे वन विभागाला टाळे ठोको आंदोलन

भीमसैनिकांना आवाहन

यंदा सर्वच सार्वजनिक उत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आले असून भिमस्मृती यात्रा देखील यंदाची रद्द करण्यात आली असल्या बाबत भीमसैनिकांना पोलीस प्रशासनातर्फे बैठक दरम्यान सांगण्यात आले आहे. यासंदर्भातील माहिती मोहाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस अधीक्षक योगेश राजगुरू यांनी पत्रकारांना दिली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com