Corona: चिंता वाढली..धुळ्यात बाधितांचा आकडा द्विशतकपार

चिंता वाढली..धुळ्यात बाधितांचा आकडा द्विशतकपार
Corona
Coronasaam tv

धुळे : धुळ्यातील कोरोना बाधितांचा आकडा द्विशतकाच्‍या पार गेला आहे. एकाच दिवसात तब्‍बल २०६ कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने आरोग्य विभागाच्या चिंतेत अधिकच भर पडली आहे. (dhule news corona positive Number of victims in Dhule crossed double hundred)

Corona
St News: जेवणाच्या डब्‍यात दारूची बाटली; एसटीवर नेमलेला चालक मद्याच्‍या नशेत

धुळे (Dhule) जिल्ह्यामध्ये कोरोनाचा आलेख दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. शनिवारी दिवसभरामध्ये एकाच दिवसात जवळपास २०६ कोरोना बाधित (Corona Positive) रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यानंतर पहिल्यांदाच बाधितांचा आकडा दोनशे पार गेला आहे. इतक्या मोठ्या संख्येने कोरोना (Corona) बाधित रुग्ण आढळून आले आहेत.

८१० रुग्णांवर उपचार सुरू

बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या रुग्णालयमध्ये ८१० कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरु आहे. कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे आरोग्य विभागाच्या चिंतेत आणखीनच भर पडली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com