धुळ्यातही लसीकरणाला लागला ब्रेक

धुळ्यातही लसीकरणाला लागला ब्रेक
धुळ्यातही लसीकरणाला लागला ब्रेक
corona vaccination

धुळे : धुळ्यात आज लसींचा तुटवडा असल्याकारणाने लसीकरणाला ब्रेक लागला आहे. धुळे शहरामध्ये लसीचा तुटवडा असल्या कारणाने शहरातील संपूर्ण लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात आले आहे. (dhule-news-coronavirus-vaccination-center-closed-no-vaccine-available)

लसींचा पुरवठा झाला नसल्यामुळे आज धुळ्यातील लसीकरणात ब्रेक लागला आहे. लसींचा पुरवठा सुरळीत झाल्यास गुरूवारीदेखील लसीकरण केंद्र सुरू राहतील की नाही याबाबत स्‍पष्‍टता अद्याप आरोग्य विभागातर्फे व्यक्त केलेली नाही. आता कोव्हीशिल्ड व कोव्हॅक्सीन दोन्ही लसींचा साठा संपल्याने शहरात लसीकरण होणार नाही; अशी माहिती महापालिकेने दिली आहे.

corona vaccination
लसीकरण केंद्र दोन दिवस बंद; जळगावात करावी लागतेच प्रतिक्षा

नवीन दोन बाधित तेही जिल्‍हाबाहेरील

जिल्ह्यात मंगळवारी नवीन दोन कोरोनाबाधित आढळून आले. पण हे दोन्ही रूग्ण अन्य जिल्ह्यातील आहेत. शहरासह धुळे तालुका, शिरपूर, साक्री, शिंदखेडा तालुक्यात एकही बाधित आढळला नाही. जिल्ह्यातील दोन रूग्णांनी मंगळवारी कोरोनावर मात केली. तसेच ११ रूग्ण सक्रिय आहेत. आत्तापर्यंत ४५ हजार ७७९ कोरोनाबाधित आढळले असून ४५ हजार १०० मुक्त झाले.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com