कपाटाचे कुलूप दुरूस्‍ती करताना सावधान; साक्री तालुक्‍यात घडलाय असा प्रकार

कपाटाचे कुलूप दुरूस्‍ती करताना सावधान; साक्री तालुक्‍यात घडलाय असा प्रकार
कपाटाचे कुलूप दुरूस्‍ती करताना सावधान; साक्री तालुक्‍यात घडलाय असा प्रकार
TheftTheft

भूषण अहिरे

धुळे : कपाटाचे कुलूप नादुरूस्‍त असल्‍यास ते दुरूस्‍तीसाठी बोलाविणे देखील महागात पडत आहे. असाच प्रकार साक्री तालुक्‍यातील खोरी या गावा झाला. कपाटाच्‍या कुलूपाची दुरूस्‍ती करण्यासाठी बोलाविलेल्‍या दोघांना हातचलाखील कपाटातील दागिने व रोख रक्‍कम लंपास केली. (dhule-news-crime-news-Theft-by-two-thieves-who-came-to-repair-the-lock)

साक्री तालुक्यातील खोरी या गावातील राहुल हिरामण भामरे यांच्या घरामध्ये खराब झालेल्या कपाटाच्या कुलुपाची दुरुस्ती करण्यासाठी दोघे आले होते. दोघा संशयितांनी कपाटातील ५२ हजाराहून अधिक किंमतीचे सोन्याचे दागिने व त्याचबरोबर कपाटात ठेवलेले १७ हजार रुपये रोकड अशी एकूण ६९ हजार रुपयांपेक्षा जास्तीचा मुद्देमाल चोरून पोबारा केल्याची घटना उघडकीस आली होती. यासंदर्भात राहुल भामरे यांनी निजामपूर पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल केली होती.

एकाच्‍या आवळल्‍या मुसक्‍या

या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला चोरी संदर्भात गुप्त माहिती दाराकडून माहिती मिळाली. या मिळालेल्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी एक पथक नंदुरबार येथे पाठवले असता, दोन चोरट्यांपैकी एका चोरट्याच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला यश आले आहे.

Theft
भुसावळ विभागातील रेल्‍वे वाहतूक दोन दिवस बंद; ३६ गाड्या रद्द

अन्‍य चोरीची कबुली

ताब्यात घेतलेल्या संशयिताने या संदर्भातील चोरीची कबुली दिली असून हा गुन्हेगार सराईत असल्याचे देखील तपासादरम्यान उघडकीस आले आहे. या संस्थेकडून आणखी काही ठिकाणी चोरी केली असल्याचे देखील या चोरट्याने कबूल केले आहे. त्याकडून इतर ठिकाणी चोरी केलेल्या आणखी काही सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले असून या चोरट्याचा साथीदाराचा देखील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाद्वारे शोध घेण्यात येत आहे.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com