सध्याची राजकीय परिस्थिती म्‍हणजे ‘सैराट’चा दुसरा पार्ट; धुळ्यातील कृषी कन्‍येकडून तुलना

सध्याची राजकीय परिस्थिती म्‍हणजे ‘सैराट’चा दुसरा पार्ट; धुळ्यातील कृषी कन्‍येकडून तुलना
Dhule News Priyanka joshi
Dhule News Priyanka joshiSaam tv

धुळे : सध्या राज्यामध्ये नव्याने आलेल्या शिंदे व फडणवीस सरकारची तुलना सैराट या सिनेमाशी धुळ्यातील कृषी कन्येने केली आहे. याड लागलं ग याड लागलं ग, सत्तेच याड लागलं ग, आताच बया का बावरल, खरंच बया ईडीला घाबरलं. या गाण्यासह सैराट टू प्रकाशित होत असल्याचे म्हणत धुळ्यातील कृषी कन्या प्रियांका जोशी हिने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सरकारवरच हल्लाबोल केला आहे. (Dhule News State Goverment)

Dhule News Priyanka joshi
संजय राऊतांच्या निवासस्थानी ईडी धाडीवर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले...

कृषी कन्या प्रियंका जोशी हिने सध्या (Dhule News) राज्यामध्ये मंत्रिपदाच्या विस्तारावरून सुरू असलेल्या नाट्यमय घडामोडींवर देखील भाष्य करत सैराट 2 यामध्ये 2 ही संख्या आहे. राज्याच्या मंत्रिमंडळात देखील मंत्र्यांची दोनच संख्या आहे; असे म्हणत शिंदे सरकार व फडणवीस सरकारला टोला लगावला आहे.

सैराटसारखाच शेवट होईल

ईडीच्या (ED) धाकाने कशा पद्धतीने सत्तेत सामावून घेण्यासाठी कारवायांचा धडाका लावला जात आहे. याचे उदाहरण म्हणून सैराट 2 ची तुलना ही शिंदे व फडणवीस सरकारशी केले आहे. सैराटमध्ये आर्ची परश्या यांचा शेवट काय झाला? त्याचबरोबर आर्ची परशाला साथ देणाऱ्या जोडीदारांची देखील कशा पद्धतीने हालत खराब झाली. अशीच परिस्थिती शिंदे सरकारची होईल असा टोला देखील कृषी कन्या प्रियांका जोशी हिने शिंदे सरकारवर बोलताना लगावला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com