बिजासन घाटात दरड..रात्रीत रस्‍ता केला मोकळा
बिजासन घाट

बिजासन घाटात दरड..रात्रीत रस्‍ता केला मोकळा

बिजासन घाटात दरड..रात्रीत रस्‍ता केला मोकळा

धुळे : मुंबई– आग्रा राष्ट्रीय महामार्गावर बिजासन घाटात दरड कोसळली आहे. रात्री उशिरापर्यंत युद्ध पातळीवर यंत्रणा राबवत रस्ता मोकळा करण्यात आला आहे. (dhule-news-Darad-in-Bijasan-ghat-cleared-the-road-at-night)

मुंबई- आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील बिजासन घाटात दरड कोसळल्याची घटना काल घडली होती. सुदैवाने दरड कोसळली त्यावेळी कोणतेही वाहन त्या ठिकाणी नसल्याने मोठा अपघात टळला. सदर दरड कोसळताच मध्यप्रदेश पोलीसांकडून रात्री उशिरापर्यंत रस्ता मोकळा करण्यात आला आहे.

बिजासन घाट
अनोखी परंपरा..एकाच घरातील ५२ चुलीवरचा नैवैद्य लाडक्या बाप्पाला!

मध्‍यप्रदेश पोलिस प्रशासन तत्‍पर

मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील बिजासण घाटात मध्यप्रदेश व महाराष्ट्र सिमेदरम्यान अचानक इंडोरकडे जाणाऱ्या लेनवर दरड कोसळली. दरड कोसळल्याने इंदौरकडे जाणारा संपूर्ण रस्ता बंद झाला होता. घटनेची माहिती मिळताच मध्यप्रदेश पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल होऊन वाहतूक एका बाजूने वळवून रात्री उशिरापर्यंत यंत्राच्या साहाय्याने मातीचा ढिगारा उपसून सदर रस्ता मोकळा केला आहे.

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com