एसआरपी जवानाच्या घरी धाडसी चोरी

एसआरपी जवानाच्या घरी धाडसी चोरी
एसआरपी जवानाच्या घरी धाडसी चोरी
thief

धुळे : शहरातील चित्तूर रोड लगत असलेल्या सेवादासनगर येथील एसआरपी जवान चंद्रशेखर वाल्मिक गवळी यांच्या घरी चोरट्यांनी डल्ला मारीत रोकडसह सोने लंपास केले. (dhule-news-Daring-burglary-at-the-home-of-an-SRP-soldier)

thief
महिलांनी फोडल्‍या दारूच्‍या बाटल्‍या; ग्रामपंचायत हरली अन्‌ केला ठराव

धुळे शहरातील सदर घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. यावेळी फिंगरप्रिंट एक्सपर्टच्या मदतीने पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असून या चोरीच्या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

एक लाखांपर्यंतचा मुद्देमाल लंपास

एसआरपीचे जवान चंद्रशेखर वाल्मिक मराठे यांचे कुटुंबीय काही कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. या दरम्‍यान घराचे कुलूप कडीकोंडा तोडून चोरट्यांनी आत प्रवेश करीत कपाटातील ७० हजार रुपयांची रोकड तसेच सोन्याचे २० ते २५ मनी असा एकूण एक लाखांपर्यंतचा मुद्देमाल चोरट्यानी लंपास केला आहे.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com