Dhule Corona Update: मृत प्रौढ कोरोना पॉझिटिव्ह; संपर्कातील पाच जणांचे नमुने तपासणीला

मृत प्रौढ कोरोना पॉझिटिव्ह; संपर्कातील पाच जणांचे नमुने तपासणीला
Dhule Corona Update
Dhule Corona UpdateSaam tv

धुळे : शहराजवळील मोहाडी उपनगरातील एका ५६ वर्षीय व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्या व्यक्तीचा कोरोना (Corona) तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे मृत व्यक्तीच्या संपर्कातील पाच जणांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. त्यासाठी (Dhule News) महापालिकेचे पथक संबंधितांच्या घरी गेले. (Maharashtra News)

Dhule Corona Update
Nandurbar News: २६ महिन्‍यांपासून वीजचोरी; २ लाख ३१ हजारांचा दंड करत पोलिसात गुन्‍हा दाखल

धुळे शहर व परिसरात मोहाडी उपनगरात एका ५६ वर्षीय व्यक्तीला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना दुर्धर आजार होता. त्यामुळे त्यांना कोरोनाची लागण झाली. उपचारादरम्यान त्यांची कोरोना चाचणी झाली. उपचारावेळी २ एप्रिलला त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. तसेच, त्याचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे मृताच्या संपर्कातील पाच जणांचे कोरोना चाचणीसाठी नमुने घेण्यात आले. आरोग्य विभागाने दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे.

Dhule Corona Update
Chandrashekhar Bawankule: नाव नाही सांगत पण २०२४ च्या आधी अनेकजण भाजपमध्‍ये उड्या मारतील; चंद्रशेखर बावनकुळे

बाधितांची संख्‍या पोहचली ५१ हजार ७०० वर

धुळे शहर परिसरात पुन्हा एकदा कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. ५ एप्रीलला आलेल्या अहवालानुसार सेवादासनगरातील ६५ वर्षीय पुरुष व साक्री येथील २७ वर्षीय तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे कोरोनाच्या एकूण कालावधीतील जिल्ह्यात आतापर्यंतची बाधितांची एकूण संख्या ५१ हजार ७०० झाली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com