Cold: महाबळेश्‍वरपेक्षा धुळे थंड; निच्‍चांकी तापमानाची नोंद

महाबळेश्‍वरपेक्षा धुळे थंड; निच्‍चांकी तापमानाची नोंद
Cold: महाबळेश्‍वरपेक्षा धुळे थंड; निच्‍चांकी तापमानाची नोंद
dhule tempreturesaam tv

धुळे : राज्यात मागील दोन– तीन दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला आहे. यात राज्‍यातील नाशिक व महाबळेश्‍वरमध्‍ये सर्वाधिक थंडी असते. परंतु, महाबळेश्‍वरपेक्षा धुळे थंड झाले आहे. महाबळेश्‍वरमध्‍ये (Mahabaleshwar) ९ तर धुळ्यात ६.६ अंश सेल्सिअस इतक्या निच्‍चांकी तापमानाची नोंद करण्यात आली. (dhule-news-Dhule-colder-than-Mahabaleshwar-Record-low-temperature)

dhule tempreture
Mahabaleshwar: पारा ९ अंशावर; बंदीमुळं पर्यटन गाेठलं

धुळ्यामध्ये (Dhule) थंडीचा कडाका पुन्हा एकदा वाढल्याचे बघायला मिळत आहे. धुळ्यात पुन्हा एकदा तापमानामध्ये घट झाली असून आज धुळ्यात ६.६ अंश सेल्सिअस इतक्या निच्‍चांकी तापमानाची (Temperature) नोंद करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून वातावरणामध्ये बदल झाला असून वातावरणामध्ये प्रचंड गारवा निर्माण झाला आहे. आणि त्यामुळेच धुळेकरांना अचानक वाढलेल्या थंडीचा सामना करावा लागत आहे.

थंडीचा कडाका

गेल्या काही दिवसांपासून अचानक वाढलेल्या थंडीचा कडाका चांगलाच जाणवत आहे. राज्‍यात मिनी काश्मीर म्हणून प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वर येथे तापमानाचा पारा कमी झाला आहे. आज सकाळी तापमानाचा पारा नऊ अंशावर आला होता. परंतु, धुळ्यात याहीपेक्षा कमी तापमानाची नोंद झाली. यामुळे धुळेकरांना गारठ्याचा सामना करावा लागत आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com