धुळे तालुक्यात पावसाच्या रिपरिपने घरांची पडझड

धुळे तालुक्यात पावसाच्या रिपरिपने घरांची पडझड
धुळे तालुक्यात पावसाच्या रिपरिपने घरांची पडझड

कापडणे (धुळे) : धुळे तालुक्यात गेल्या चार– पाच दिवसांपासून रिमझिम पाऊस होत आहे. तालुक्यात रिमझिम पावसामुळे शंभरावर घरांची पडझड झाली आहे. महसुल विभागाचे कर्मचारी यथावकाश पंचनामा करीत आहेत. ६५ मिमी पाऊस झाल्यावरच नुकसान भरपाई मिळण्याच्या निकषामुळे ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त होत आहे. (dhule-news-Dhule-taluka-houses-collapsed-due-to-continue-rains)

धुळे तालुक्यात अद्यापही बहुतांश घरे गारा माती, लाकडाची आहेत. पावसाळ्यात या घरांची पडझड होत असते. सध्या तालुक्यात पावसाची रिपरिप सुरु आहे. बर्‍याचशा घरांची पडझड झाली आहे.

कापडणेत घरांची पडझड

कापडणे गावातील बोरसे गल्लीतील रहिवाशी नथ्थू पाटील यांच्या पुर्ण घराची भिंत मुसळधार पावसाने कोसळली. सुदैवाने जिवीतहानी झाली नाही. नथ्थू पाटील, बापू पाटील, रजूबाई पाटील व गुलाब पाटील यांच्या घरांची मोठी पडझड झाली आहे. तलाठी वैशाली पाटील व कोतवाल रवींद्र भामरे यांनी पंचनामा केला.

धुळे तालुक्यात पावसाच्या रिपरिपने घरांची पडझड
पाणी आणण्यासाठी गेलेला बालक आलाच नाही; शेतात विजेच्या धक्क्याने मृत्यू

ते निकष बदलणे गरजेचे

पावसामुळे घरांची मोठी पडझड होत असते. नुकसानग्रस्त घरांचे दरवर्षी पंचनामे होत असतात. पासष्ट मिली पावसाचा निकष असल्याने भरपाई मिळत नाही. हा निकष शिथील करावा. नुकसानग्रस्तांना भरपाई मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com