खासदार सुभाष भामरेंना धक्‍का; तीनही माजी आमदारांनी राखला गड

खासदार सुभाष भामरेंना धक्‍का; तीनही माजी आमदारांनी राखला गड
खासदार सुभाष भामरेंना धक्‍का; तीनही माजी आमदारांनी राखला गड
DCC Bank

धुळे : धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीमध्ये तीन माजी आमदारांनी आपला गड कायम राखला आहे. मात्र भापचे खासदार सुभाष भामरे यांना धक्‍का बसला आहे. (dhule-news-DNBCC_election-MP-Subhash-Bhamre-pushed-All-three-former-MLAs-victory)

DCC Bank
JDCC Bank : सहकार पॅनल २० जागांवर विजयी

धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीमध्ये तीन माजी आमदार यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. परंतु या तीनही माजी आमदारांनी आपला गड राखत दणदणीत विजय मिळवला आहे. यामध्ये नंदुरबारचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी त्याचबरोबर धुळ्याचे माजी आमदार शरद पाटील तसेच माजी आमदार राजवर्धन कदमबांडे या तीनही माजी आमदारांनी विजय मिळवला आहे. परंतु, यामध्ये भाजपचे माजी संरक्षण राज्यमंत्री तथा खासदार सुभाष भामरे यांचे भाऊ सुरेश रामराव पाटील यांचा पराभव झाला असून या पराभवामुळे सुभाष भामरे यांना चांगलाच धक्का मानला जातो आहे. माजी आमदार शरद पाटील यांनी सुभाष भामरे यांच्या भावाचा पराभव केला आहे.

भाजपचे आठ उमेदवार विजयी

निवडणुकीदरम्यान भाजप, काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्याचे बघायला मिळाले. तर शिवसेनेने मात्र वेगळी चूल मांडल्यामुळे यामध्ये सर्वपक्षीय आघाडीत शिवसेनेतर्फे बिघाडी करीत ही निवडणूक बिनविरोध होऊ दिली नसल्याचे बघायला मिळाले आहे. यामध्ये भाजपचे आठ उमेदवारांचा विजय झाला असून इतर नऊ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेनेचे उमेदवार विजय झाले आहे.

बँकेची चावी पुन्‍हा कदमबांडेकडे?

निवडणुकीमध्ये माजी मंत्री तथा आमदार अमरीशभाई पटेल यांनीदेखील या निवडणुकीत चांगलाच जोर लावला होता. तसेच माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्या शेतकरी विकास पॅनलचे सर्वाधिक उमेदवार असल्या कारणाने धुळे-नंदूरबार जिल्हा बँकेच्या सत्तेची चावी पुन्हा एकदा राजवर्धन कदमबांडे यांच्याच हातात जाणार हे जवळपास निश्चित झाले आहे.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com