नशेचा बाजार चालवणाऱ्या एकाच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

नशेचा बाजार चालवणाऱ्या एकाच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
Dhule News
Dhule NewsSaam tv

धुळे : नशेचा बाजार चालवणाऱ्या एका इसमाच्या पोलिसांनी नशेच्या बाटल्यांसह मुसक्या आवळल्या आहेत. संबंधित इसमाला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आणखी काही जणांची नावे या नशेचा बाजार चालवण्यासंदर्भात उघडकीस आली असून, धुळे शहर पोलीस आता या नशेचा बाजार चालवणाऱ्या टोळीचा शोध घेत आहेत. (Dhule Police News)

धुळे शहरातील संतोषी माता चौक येथे रेगझोन टी नावाच्या नशेच्या मोठ्या प्रमाणात बाटल्या या विक्रीच्या हेतूने एक इसम आणणार असल्याची गुप्त माहितीदारा मार्फत धुळे शहर पोलिसांना माहिती मिळाली होती. या माहितीच्या अनुषंगाने धुळे शहर पोलिसांनी संतोषी माता चौक येथे सापळा रचला असता या सापळ्यात संबंधिताच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. त्याच्याकडून जवळपास 120 या नशेच्या बाटल्या पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. ज्यांची बाजारामध्ये 27 हजाराहून अधिकची किंमत मानली जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com