बाजारात भाव नसल्यामुळे बांधावर उपटून फेकले पिक

बाजारात भाव नसल्यामुळे बांधावर उपटून फेकले पिक
बाजारात भाव नसल्यामुळे बांधावर उपटून फेकले पिक
Farmer

भूषण अहिरे

धुळे : एकीकडे जुलै महिना अर्धा होत आला तरी देखील समाधानकारक पाऊस पडत नसल्यामुळे पाण्याअभावी शेतकऱ्यांना पिकांची लागवड करणे शक्य होत नाहीये. परंतु असे असले तरी दुसरीकडे घेतलेल्या पिकांना भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांना अक्षरशः शेतात जिवापाड जपून वाढवलेली पिक भाव नसल्यामुळे काढून बांधावर फेकण्याची वेळ आली आहे. (dhule-news-Due-to-lack-of-market-prices-the-crop-was-uprooted-on-the-embankment)

धुळे तालुक्यातील निमगुळ या ठिकाणी किशोर मोहन चव्हाण यांच्या दोन एकर क्षेत्रामध्ये काकडीची लागवड केली होती. पीकही चांगल आले. यासाठी जवळपास वीस ते पंचवीस हजार रुपये खर्च केला होता. परंतु बाजारामध्ये काकडीला कवडीमोल भाव मिळत असल्यामुळे या शेतकऱ्याला दोन एकर क्षेत्रात पिकलेली काकडी काढून फेकावी लागली. शेतकऱ्याने आपल्या शेतातून हे काकडीचे पीक काढून बांधावर फेकले आहे.

Farmer
कौटुंबिक वादातून खून; शालकाच्‍या डोक्‍यात घातला कुऱ्हाडीचा घाव

खर्च अन्‌ मजुरीही परवडेना

काकडीची लागवड केल्‍यानंतर त्‍यास आतापर्यंत पंचवीस हजार रूपयांचा खर्च शेतकऱ्याने लावला. आता मार्केट सुरू झाल्‍याने चांगला भाव मिळेल अशी आशा होती. मात्र बाजारात काकडीला अगदी कवडीमोल भाव मिळत असल्‍याने मजुर लावून ती तोडणे देखील परवडत नसल्‍याने अखेर काकडीचे पिक व काकडी उपटून बांधावर फेकावी लागली.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com