भल्यामोठ्या सापाबरोबर कारमधून थरारक प्रवास

वाहन चालवत असताना नजरेसमोर काचेवर एका भल्या मोठ्या सापाची इंट्री झाली. असे स्‍वप्‍न पाहिले तरी तुम्ही दचकून उठल्याशिवाय राहणार नाही; परंतु हे वास्तवात घडलं आहे.
भल्यामोठ्या सापाबरोबर कारमधून थरारक प्रवास
snake

भूषण अहिरे

धुळे : तुम्ही स्वप्नात जरी विचार केला की चार चाकी वाहनातून तुम्ही प्रवास करत असताना वाहनाच्या बोनेटवर वाहन चालवत असताना नजरेसमोर काचेवर एका भल्या मोठ्या सापाची इंट्री झाली. असे स्‍वप्‍न पाहिले तरी तुम्ही दचकून उठल्याशिवाय राहणार नाही; परंतु हे वास्तवात घडलं आहे. (dhule-news-family-car-traveling-night-and-snake-entry-car-bonet)

मध्यप्रदेशकडून परिवारासह येत असताना शिरपूरजवळ गाडीमध्ये सापाविषयी गप्पा चांगल्याच रंगलेल्या असतांना चालत्या कारच्या बोनेटवर भलामोठा साप अचानक येतो. हा साप आल्‍यामुळे कारमधील सर्व जण भयभीत झाले. या सापाने वाहनामध्ये बसलेल्या सर्वांनाच चांगलेच घाबरवून सोडले.

मारायचे नाही म्‍हणून कार चालवत राहिले

तब्बल तीन किलोमीटरपर्यंत हा साप कार वरतीच बसून होता. सापाच्या संपूर्ण हालचालींवर कारमध्ये बसलेल्या प्रत्येकाचे बारीक लक्ष होते. या सापाला मारायचे नाही; या उद्देशाने कार चालकांने तब्बल तीन किलोमीटर अंतर सापासोबत पार केल्यानंतर एका सर्विस स्टेशनजवळ कार नेऊन थांबवली.

snake
‘व्‍हॅलेंटाइन डे’ला केला गुपचूप विवाह; पाच महिन्‍यातच संपला संसार

सर्पमित्राने सोडले जंगलात

कारवर साप असल्याचे बघून सर्विस सेंटर जवळील काही जणांनी सापाला मारण्याचा प्रयत्न केला. परंतु कार चालकाने त्यांना तात्काळ थांबविले व सापाला मारण्यापासून रोखले. सर्विस सेंटरवरील नागरिकांनी सर्पमित्राला याबाबतची कल्पना दिली; त्यानंतर सर्पमित्राने मोठ्या शर्थीच्या प्रयत्नानंतर या सापाला पकडले. त्यानंतर या सापाला जंगलात सोडून गाडीवर बसून प्रवास करणाऱ्या सापाला जीवनदान दिले आहे.

अनुभव सांगतानाही थरकाप

हा अनुभव सांगताना वाहन चालकांनी वाहन चालवत असताना साप बोनेटवर विराजमान होण्यापासून ते सर्पमित्रांनी या सापाला पकडून त्याच्या अधिवासात सोडेपर्यंतचा सर्व थरार सांगितला आहे. हे सांगताना देखील त्‍यांचा थरकाप उडत होता.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com