पिक विमा भरण्याकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ

पिक विमा भरण्याकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ
पिक विमा भरण्याकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ
पिक विमा

त-हाडी (धुळे) : शेतकऱ्याला नेहमीच नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागतो. कधी दुष्काळी परिस्थितीशी तर कधी अतिवृष्टीशी आशा परिस्थितीमुळे शेतकऱ्यांनी शेतात पिकवलेल्या पिकाचा विमा काढणे गरजेचे आहे. कारण दुष्काळ असो अथवा अतिवृष्टी असो आशा वेळेस पिकाचे झालेले नुकसान काढलेले पीक विमातुन तरी भरून निघेल आशा अपेक्षा पोटी शेतकरी आपल्या पिकांचा खरिपाचा व रब्बीची विमा काढत असतो. परंतु गत दोन वर्षांपासून खरीपाच्या पिकाच्या काळात नेहमीच अतिवृष्टीचा पाऊस पडून पिकाचे प्रचंड नुकसान होऊन ही पिकाचा काढलेला विमा मात्र मंजूर होत नसल्याने या वर्षी शेतकऱ्यांनी खरिपाचा पीक विमा भरण्याकडे पाठ फिरवल्याचे चित्र त-हाडी, वरूळ, भटाणे, जवखेडा विखरणसह तालुक्यात पाहण्यास मिळत आहे. (dhule-news-farmer-not-responce-crop-insurance-last-two-days)

खरिपाच्या पेरणी करता सावकरासह बॅंकांकडुन कर्ज काढून शेतात खरिपाची पेरणी करायची व उरलेल्या पैशातून पिकाचा विमा भरायचा त्यातच कधी काळी पिके जोमात असताना पाऊस दांडी मारीत राहतो, तर कधी हाता तोंडाशी आलेला घास अति पावसाने हिरावुन घेऊन जातो. ही परिस्थिती गत दोन वर्षांपासून तालुक्यात कायम आहे. हक्काचा पिकाचा काढलेल्या विमा मंजूर होईल व झालेले नुकसान भरून निघेल आशी आशा शेतकऱ्याला कायम असते. मात्र गत दोन वर्षांपासून प्रचंड पिकाचे नुकसान झाले. कंपनीला मेलद्वोरे कळवले परंतु पीक विमा मंजूर होत नसल्याने शेवटी शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा विमा काढायचेचे बंद केल्याचे चित्र पाहण्यास मिळू लागले आहे.

पिक विमा
शाळा इमारती नसल्याने झोपड्यांमध्ये शिक्षण; सातपुड्यातील गावांमधील धक्कादायक वास्तव

जिल्ह्यात डझनभर आमदार

गत दोन वर्षापासून अतिवृष्टी पावसामुळे खरिप पिकाचे प्रचंड नुकसान होऊन देखील शेतकऱ्याला संबंधित कंपनीने पीक विम्याची रक्कम मंजूर करून दिली नाही. व ही रक्कम शेतकऱ्याला देण्यात यावी याकरिता जिल्हातील कुठला आमदार आवाज उठवताना पाहण्यास मिळाला नसून जिल्ह्यात डजन भर पेक्षा जास्त आमदार असून एकही कामाचा नसल्याचे शेतकऱ्यातून बोलले जात आहे. पिकाचे नुकसान होऊन पीक विमा मिळत नाही त्यापेक्षा न भरलेला बरा असे शेतकऱ्यातून बोलले जात आहे.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com