वर्षभरापुर्वी बांधण्यात आलेली विहीर मुसळधार पावसात ढासळली

वर्षभरापुर्वी बांधण्यात आलेली विहीर मुसळधार पावसात ढासळली
वर्षभरापुर्वी बांधण्यात आलेली विहीर मुसळधार पावसात ढासळली

भूषण अहिरे

धुळे : साक्री तालुक्यातील विरखेल शिवारात रात्री झालेल्या मुसळधार पावसानंतर दिलीप न्याहलसिंग वंजारी यांच्या शेतात ग्रामीण हमी योजनेच्या अंतर्गत २०१५–१६ या वर्षात सिंचन विहीर बांधण्यात आली होती. रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे ही विहीर पूर्णतः खचल्यामुळे जमीनदोस्त झाली आहे. (dhule-news-farmer-well-which-was-built-a-year-ago-collapsed-in-heavy-rains)

प्रशासनातर्फे ग्रामीण हमी योजनेचा मोठ्या प्रमाणात गाजावाजा करण्यात आला. या योजनेतून शेतकरी दिलीप वंजारी यांना विहीर देखील खोदून देण्यात आली. परंतु या योजनेअंतर्गत केलेले काम अतिशय निकृष्ट असल्याने यावर्षीच्या पहिल्याच मुसळधार पावसामध्ये विहीर पूर्णतः जमीनदोस्त झाली आहे.

वर्षभरापुर्वी बांधण्यात आलेली विहीर मुसळधार पावसात ढासळली
मंदिरात देवीच्या मूर्तीचे उघडले डोळे..भाविकांची गर्दी; काय आहे सत्‍य जाणून घ्या

नुकसान भरपाईची मागणी

विहीर खचल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या शेतकऱ्यातर्फे प्रशासनाकडून लवकरात लवकर पंचनामा करण्यात यावा; व शेतकऱ्यास नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात येत आहे.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com